अर्धापूर तालुक्यात प्रशासन आपल्या गावी आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST2021-02-05T06:07:38+5:302021-02-05T06:07:38+5:30

अर्धापूर महसूल मंडळातील जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकारने ‘प्रशासन आपल्या गावी’ या उपक्रमाची सुरुवात केली असून, या कार्यक्रमास तहसील ...

Administration in Ardhapur taluka in your village from today | अर्धापूर तालुक्यात प्रशासन आपल्या गावी आजपासून

अर्धापूर तालुक्यात प्रशासन आपल्या गावी आजपासून

अर्धापूर महसूल मंडळातील जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकारने ‘प्रशासन आपल्या गावी’ या उपक्रमाची सुरुवात केली असून, या कार्यक्रमास तहसील प्रशासनाचे अधिकारी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, उपअभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अर्धापूर व तालुक्यातील कृषी कार्यालयाचे कृषी सहायक, शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शासनाचे विविध अधिकारी प्रशासन आपल्या गावी या कार्यक्रमास उपस्थित राहून जनतेच्या अडीअडचणी सोडविणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली असून, जनतेने प्रशासन आपल्या गावी, या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांनी व प्रशासनाने केले.

Web Title: Administration in Ardhapur taluka in your village from today