दोन हायवांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:26 IST2021-02-23T04:26:54+5:302021-02-23T04:26:54+5:30

अवैध दारू पकडली मुखेड- शहरातील सिनेमा टॉकीजजवळ एका इसमाकडून ४ हजार ६८० रुपयांची अवैध दारू पोलिसांनी पकडली. याशिवाय मोटारसायकलही ...

Action on two highways | दोन हायवांवर कारवाई

दोन हायवांवर कारवाई

अवैध दारू पकडली

मुखेड- शहरातील सिनेमा टॉकीजजवळ एका इसमाकडून ४ हजार ६८० रुपयांची अवैध दारू पोलिसांनी पकडली. याशिवाय मोटारसायकलही जप्त केली. ही कारवाई गुरुवारी (दि. १८) करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक गणपती चित्ते यांनी फिर्याद दिली.

शिवजयंती उत्साहात साजरी

बिलोली- हुनगुंदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मल्लू, योगेश भाले, शिवलिंग पाटील, रमेश अप्पा स्वामी, महेंद्र मराठे, गंगाधर भाले, संजय गायकवाड, आदी उपस्थित होते.

हरभरा काढणीला सुरुवात

हदगाव- हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा, पळसा, मनाठा, पिंपरखेड, चिंचगव्हाण, माळझरा, हरभरा काढणीला सुरुवात झाली. ऐन काढणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांची बरीच तारांबळ उडाली. अनेक शेतकरी चिंतेत आहेत.

अखंड हरिनाम सप्ताह

भोकर- तालुक्यातील धानोरा येथील हनुमान मंदिर कलशारोहण वर्धापनदिनाचे औचित्य साधून १८ ते २५ फेब्रुवारीदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद्‌ भागवत कथाज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने दररोज काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा, हरिपाठ, हरिकीर्तन, भजन, आदी कार्यक्रम होणार आहेत.

अस्वलाचा बंदोबस्त करा

माहूर- आष्टा गावात गेल्या १५ दिवसांपासून रोज रात्री मादी अस्वलाचे दर्शन होत आहे. या अस्वलाने आतापर्यंत तिघांवर हल्ला केला. त्यामुळे सदर अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

आरोग्य केंद्रास भेट

कुंडलवाडी- येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खेळगे यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रास डस्टबिनची भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी सातमवाड, डॉ. नरेश बोधनकर, डॉ. अरविंद बोधनकर, रमेश पेंटावार, संतोष चव्हाण, प्रदीप रत्नागिरी, व्यंकट खराडे, आदी उपस्थित होते.

शिवजयंती साजरी

हिमायतनगर- तालुक्यातील जवळगाव येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी सरपंच उत्तमराव पाटील होते. यावेळी पांडुरंग पाटील, बापूराव पाटील, बाबाराव पाटील, गंगाधर पांचाळ, शेख, दिगंबर पाटील, सुभाष माने, गणपत नाचारे, शंकरराव धरमुरे, आदी उपस्थित होते.

७८ हजारांचा महसूल

भोकर- येथील पोलीस ठाण्यामध्ये जमा असलेल्या १४ वाहनांचा लिलाव करण्यात आला. यातून ७८ हजार ५०० रुपयांचा महसूल शासनाला मिळाला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ राजनकर, नायब तहसीलदार पांडे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, सपोनि एस. बी. डेढवाल, पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे उपस्थित होते.

५१ हजारांची देणगी

भोकर - राममंदिर उभारणीसाठी पाळज येथील गणेश मंदिराकडून ५१ हजारांची देणगी संबंधित समितीकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी मंदिराचे अध्यक्ष गणेश गंदमवार, बालाजी पप्पुलवाड, सुभाष चटलावार, आनंद देशमुख, व्यंकटेश आसरवाड, अवधुत सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.

Web Title: Action on two highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.