शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या धसक्याने धान्य घोटाळ्यातील आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 08:11 IST

अजय बाहेतींच्या अटकेनंतर धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : राज्यभरात गाजलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्यात सर्वच आरोपींना जामीन मिळाला आहे. परंतु या प्रकरणात आता ईडीने एन्ट्री करून इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनीचे मालक अजय बाहेती यांना अटक केली आहे. त्यामुळे घोटाळ्यातील इतर आरोपींचे धाबे दणाणले असून अनेकजण भूमिगत झाले आहेत. 

१८ जुलै २०१८ रोजी तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशाेर मीणा यांच्या पथकाने सापळा रचून शासकीय धान्याचा काळाबाजार होत असताना दहा ट्रक पकडले होते. या ट्रकमध्ये शासकीय वितरण व्यवस्थेचा शिक्का असलेली सहा हजार पोती आढळून आली होती. या प्रकरणात पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. त्यात धान्य व्यापारी, पुरवठादार, शासकीय अधिकारी यांच्यासह अनेकांचा सहभाग आढळला. त्यांनतर हर्सूल कारागृहात असताना त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. या प्रकरणात तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हे फरार आहेत. परंतु दोन दिवसांपूर्वी अचानक ईडीने या प्रकरणात एन्ट्री घेतली. अजय बाहेती यांना अटक करून आठ दिवसांची कोठडी सुनावली. त्यामुळे घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत. 

धान्याचा काळाबाजार अजून सुरूचराज्यभरात कृष्णूरच्या घोटाळ्याने नांदेडची बदनामी झाली. पोलिसांनी अनेकांना अटक केली. मात्र धान्याच्या काळाबाजारात नवीन पिढी उतरली आहे. ग्रामीण भागात काही जणांचे गोदाम असून तेथून धान्याची विल्हेवाट लावली जाते, अशी माहिती आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस