श्रीक्षेत्र माहूर : माहूर गडावरील श्रीदत्त शिखर घाटातून वाझरा येथील शेख फरीद बाबा दर्गाह येथे कंदुरीसाठी प्रवाशांना घेवून जाणाऱ्या आॅटोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने आॅटो उलटून १३ भाविक जखमी झाल्याची घटना २२ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता घडली.यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मौजे वाकान कोंदरी येथील चार परिवारातील भाविक दर वर्षीप्रमाणे शेख फरीद दर्गाह येथे कंदुरी (न्याज) करण्यासाठी सकाळी आॅटो (क्ऱएम़एच़२९-८८६१) व एक टाटा टेम्पो घेऊन निघाले होते़ आॅटोत १३ भाविक चालकासह तर टेम्पोत १५ भाविक प्रवास करीत होते़ टेम्पो शिखर घाटातून पुढे निघून गेला तर आॅटो मागून घाटातून हळूहळू जात होता़ घाटातील शेवटच्या वळणावर आॅटोचालक सै़जैनूल्ला खान (वय २०) याचा आॅटोवरील ताबा सुटल्याने आॅटोने दोन पलट्या खाल्ल्या़ यात आॅटोतील स. करीम स. सलीम (वय १९) व शे़अल्ताफ शे़मौला या दोघांना गंभीर मार लागला़ उत्तम लोंढे (वय ६०), अरुण वंजारे (वय ५३), शेग़फुरला शे़ बाबाअली (वय ५०), शे़रफिक शे़ फरीद (वय ४३), सै़हुसेन सै़छोटू (वय ४०), राजू घड्याळे (वय ३२), सुनील वंजारे (वय २३), गजानन घड्याळे (वय ३३), पांडुरंग लोंढे (वय ५०), शे़शोएब शे़अखतर (वय १७) किरकोळ जखमी झाले आहेत़वझरा येथे कामानिमित्त जात असलेले सुजाण भारती यांनी घटना पाहून दोन्ही गंभीर जखमींना आपल्या मोटारसायकलवरून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले आणि त्यांच्या पुढे गेलेल्या भाविकांना घटनेची माहिती दिली़त्यानंतर पाठीमागून आलेल्या दुसऱ्या वाहनाने उर्वरित जखमी भाविकांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ़ वाघमारे व परिचारिका यांनी जखमीवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जखमीतील दोघांना यवतमाळ येथे पाठविण्यात आले़ इतर भाविकांना उपचार करून सुटी देण्यात आली़ पोलिसांनी घटनेची नोंद घेतली.दरम्यान, माहूर रस्त्यावरील घाट परिसरात मागील काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. या बरोबरच वळण घाटातील गतिरोधके तसेच मार्गदर्शीका फलकांची नव्याने रंगरंगोटी करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
दत्त शिखर घाटात अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:40 IST
माहूर गडावरील श्रीदत्त शिखर घाटातून वाझरा येथील शेख फरीद बाबा दर्गाह येथे कंदुरीसाठी प्रवाशांना घेवून जाणाऱ्या आॅटोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने आॅटो उलटून १३ भाविक जखमी झाल्याची घटना २२ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता घडली.
दत्त शिखर घाटात अपघात
ठळक मुद्देचालकाचे नियंत्रण सुटले अकरा भाविक जखमी, दोघे गंभीर