आधार लिंक सिस्टीम डूब्लिकेट विद्यार्थी शोधणार ; आता संस्थेच्या शाळांचे बिंग फुटणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:34 IST2021-02-21T04:34:29+5:302021-02-21T04:34:29+5:30
शासनाने प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आधार कार्ड लिंक करायला सांगितले आहे. हे आधारकार्ड लिंक करतांना एकीकडे लिंक होते. दुसरीकडे ...

आधार लिंक सिस्टीम डूब्लिकेट विद्यार्थी शोधणार ; आता संस्थेच्या शाळांचे बिंग फुटणार ?
शासनाने प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आधार कार्ड लिंक करायला सांगितले आहे. हे आधारकार्ड लिंक करतांना एकीकडे लिंक होते. दुसरीकडे लिंक होतच नाही . आधार लिंकसाठी असं सॉपटवेअर तयार केलं की एका शाळेत लिंक झालं तर दुसरीकडे लिंक होतच नाही. तो विद्यार्थी दुसऱ्या कोण्या शाळेत आहे ते दाखवते. त्यामुळेच डूब्लिकेट विद्यार्थ्यांचे बिंग पटापटा बाहेर पडत आहे. हा गोंधळ कांही खासगी संस्थेत जास्त असल्याचे बोलले जात आहे.
विद्यार्थ्यांचे आधारकार्ड लिंक करण्यासाठी शासनाने शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आधारकार्ड लिंक करण्याचे काम सुरू आहे. ८० टक्के आधार लिंक चे काम पूर्ण झाले. मात्र डूब्लिकेट विद्यार्थ्यांमुळे २० टक्के आधार लिंकचे काम रखडले आहे. असे शिक्षण विभाग सांगत आहे. जे डूब्लिकेट विद्यार्थी सापडतील तशा पालकांची सहमती घेऊन ज्या शाळेत शिकवायचे आहे. त्याच शाळेत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे डूब्लिकेट प्रवेश रद्द होणार आहे. मात्र डूब्लिकेट विद्यार्थ्यांच्या नावावर घेतलेल्या विविध योजनेच्या लाभाचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. डबल ऍडमिशन ( प्रवेश) आधार लिंकमुळे उघड होऊ पहात आहे. या विद्यार्थ्यांच्या आधार लिंकवरच शिक्षक संच मान्यता अवलंबून आहे. शिक्षण विभागाने पट पडताळणी सारखी मोहीम राबवून कसून चौकशी केल्यास डूब्लिकेट विद्यार्थ्यांचे बिंग बाहेर पडू शकते. याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती गोळा करणे सुरू असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी एन एन पांचाळ यांनी लोकमत शी बोलतांना सांगत लवकरच डूब्लिकेट विद्यार्थ्यांचा आकडा समोर येईल असेही त्यांनी सांगितले