शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

व्यायामाला गेलेल्या तरुणास दुचाकीने उडवले; उपचारादरम्यान झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 20:00 IST

एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

- गोविंद टेकाळे अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : सकाळी व्यायामाला गेलेल्या तरुणाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी यमशेटवाडी येथे घडली. व्यंकटेश उकाजी कंकाळ ( १८)  असे मृत तरुणाचे नाव आहे. 

व्यंकटेश कंकाळ आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास व्यायामासाठी घराबाहेर पडला. खडकुत ते यमशेटवाडी रोडवरून जात असताना त्याला भरधाव दुचाकीने उडवले. यात व्यंकटेश गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यास नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान व्यंकटेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

कुटुंबातील एकुलता एकव्यंकटेशच्या पश्चात आजी - अजोबा, आई-वडील, एक बहीण, काका-काकू असा मोठा परिवार आहे. चुलते दत्ता कंकाळ यांना चार मुली आहेत. दोन्ही कुटुंबात एकच मुलगा असल्याने व्यंकटेश सर्वांचा लाडका होता. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात