शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शेतात झोपलेल्या तरुणाची गळा चिरून हत्या; संशयित आरोपी रातोरात गावातून पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 16:48 IST

संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळे तीन पथके रवाना झाली आहेत.

उमरी (जिल्हा नांदेड) : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून आखाड्यावर झोपलेल्या तरुणाचा धारदार शस्त्रांनी गळा चिरून निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी. घटनेनंतर संशयित आरोपींनी गाव सोडून पलायन केले असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. उमाकांत गोविंद नंदगाये वय २३ वर्षे रा. कळगाव ता. उमरी असे या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

रोजच्याप्रमाणे सकाळी उमाकांत शेतावरून घरी आला नाही. म्हणून त्याचा चुलत भाऊ महेश नंदगाये याने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण फोन उचलला नाही. त्यामुळे तो शेतातील आखाड्यावर पोहोचला. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत उमाकांतचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते, पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. 

झटका मशीनच्या वादातून जीव गेलादरम्यान, पिकाच्या संरक्षणासाठी रानडुकराला झटका देण्यासाठीची मशीन चोरल्याच्या संशयावरून उमाकांत याचे दोन दिवसांपूर्वी काही जणांसोबत वाद झाला होता. यावेळी उमाकांतचा चुलत भाऊ महेश नंदगाये यांनी हा वाद सोडविला. त्यानंतर शुक्रवारी उमाकांत हा दररोजच्या प्रमाणे आखाड्यावर झोपायला गेला. वाद झालेल्यांचे शेत शेजारीच असल्याने त्यांना याची माहिती होती. ही संधी साधून त्यांनीच उमाकांत याचा खून केल्याची तक्रार महेश नंदगाये यांनी उमरी पोलिसात केली. 

संशयित आरोपी गावातून पसार या प्रकरणी बालाजी यशवंत धुतुरे ,पुरुषोत्तम बाबू सरोदे, माधव यशवंत धुतुरे, राहुल बाबू सरोदे, माधव कोडोपंत तारू, यशवंत गंगाराम धुतुरे या सहा आरोपींविरुद्ध हत्त्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटना घडल्यापासून संशयित आरोपींनी घराला कुलूप लावून रातोरात गावातून पलायन केले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळे तीन पथके रवाना झाली आहेत. तसेच कळगाव शिवारातील घटनास्थळी पोलिसांचे श्वानपथक तसेच फॉरेन्सिक टीमने भेट देऊन माहिती गोळा केली. सदर हत्या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंकुश माने हे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड