शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीसाठी जाताना जीपचे टायर फुटले; अपघातात सासूसह जावई ठार

By प्रसाद आर्वीकर | Updated: August 18, 2022 19:50 IST

महामार्गावर कुष्णूरजवळ जीपचे समोरील टायर फुटल्याने जीप पलटी खाल्ली.

नायगाव/ कृष्णूर (नांदेड) : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी नांदेडला जाणाऱ्या वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात देगलूर तालुक्यातील जावई आणि सासूचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हैदराबाद मार्गावरील कृष्णूरजवळ ही घटना घडली.

नांदेड येथील देगलूर नाका परिसरात एका नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी देगलूर तालुक्यातील गोनेगाव व देगाव येथील नातेवाईक केए ३२/ एम ६४३२ या क्रमांकाच्या क्रुजर जीपने जात होते. सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान नांदेड- हैदराबाद महामार्गावर कुष्णूरजवळ जीपचे समोरील टायर फुटल्याने जीप पलटी खाल्ली. यात शेख महेबूब बाबू शेख (४०) व अहेमदबी शेख खुदबोद्दिन शेख (५५) या जावई व सासूचा जागीच मृत्यू झाला. पिरसाब नवाबसाब शेख (६५,गोनेगाव), खाजा मगदूम शेख (४५), फरजना खाजा शेख (४०, देगाव), खुदबोद्दीन नवाज साब (६० देगाव), घाशी साब बाबूसाब शेख (५५, चालक, गोनेगाव ),  शादुल बाबूसाब शेख (४५, गोनेगाव) , आजमिर महेबूब शेख (४०, गोनेगाव), खाजा साब मौलासाब शेख (४५), हैदर इस्माईल साब शेख (४०, गोनेगाव) हे ८ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

सदरील अपघाताची माहिती समजताच कुंटूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी, पोलीस उप निरिक्षक दिनेश येवले व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाल्यानंतर काही जखमींनी मदतीची वाट न बघता मिळेल त्या वाहनाने नांदेड गाठले. काही जखमी शासकीय रुग्णालयात तर काही जण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAccidentअपघातNandedनांदेड