शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार दुभाजकपारकरून ट्रकला धडकली; तिहेरी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 11:28 IST

या अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक तर  ६ जखमी आहेत

- गोविंद टेकाळे अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील दाभड परिसरात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात १० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी २ जण ठार तर २  जणांची प्रकृती चिंताजनक आहे. नांदेड- नागपूर हायवेवर दाभड हद्दीतील बाबा पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात सोमवारी रात्री साडेबारा वाजता झाला.

नांदेड - नागपूर हायवेवर बाबा पेट्रोल पंपाजवळ रात्री साडेबारा वाजता  चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ( एम.एच ३७ जी ९८८९ ) दुभाजक ओलांडून रस्त्यावर विरुद्ध दिशेकडे गेली. यावेळी कारने ट्रकला जोरदार धडक दिली. याच दरम्यान, पाठीमागून येत असलेली दुसरी कार ( क्र.एम.एच २३. ए.डी.३५६७ ) ट्रकवर धडकली. 

या तिहेही अपघातात ट्रक चालक रामा प्रल्हाद डोंगरे ( ५० रा.इंचगाव ता.मोहोळ जि.सोलापूर ) व कारमधील अमित विठ्ठल घुगे ( वय २९ रा.तरोडा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्गाचे अविनाश चव्हाण, पोउनि कपिल आगलावे, इर्शाद बेग,चालक रमाकांत शिंदे, राजकुमार व्यवहारे, संदीप चटलेवार, जसप्रीत सिंग शाहू, वसंत शिंनगारे,कल्याण पांडे, महेंद्र डांगे यांनी धाव घेत जखमींना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. 

जखमींचे नावे अशी कार मधील: स्वप्निल शिवाजी पाटील, साईनाथ मुळे ( रा.नाईक नगर नांदेड), अभिजीत शिरफुले हे गंभीर जखमी झाले आहेत. तर ट्रकला पाठीमागून धडकलेल्या दुसऱ्या कारमधील झेहनब सय्यद, नजमा बेगम, सय्यद अहमद, नाहीद बेगम, जावेद सय्यद, सय्यद अयान ( रा.सर्व बरकतपुरा माळटेकडी रोड नांदेड)  किरकोळ जखमी झाले आहेत.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात