शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औषधी आण्यासाठी घराबाहेर पडलेल्या सेवकाचा अपघातात जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 17:47 IST

नायेगाव येथील इसमाचा अर्धापूर परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड ) : भोकरफाटा ते बारड रस्त्यावरील कलदगाव परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. हा अपघात बुधवारी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास झाला असल्याचा अंदाज असून याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शंकरनगर येथील लक्ष्मण बळवंतराव सुर्यवंशी हे ( ता. नायेगाव, जिल्हा नांदेड)  कै.मोहनरावजी देशमुख हायस्कूल अंजलेगाव येथे सेवक पदावर कार्यरत होते. बुधवारी औषधी घेण्यासाठी उमरखेड येथे जाण्यासाठी दुचाकीवरुन ते घराबाहेर पडले. प्रवासादरम्यान बुधवारी रात्री बारड - भोकरफाटा या रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यावेळी डोक्याला जबरदस्त मार लागल्याने लक्ष्मण सुर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी परिसरातील शेतकऱ्यांना हे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच अर्धापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह अर्धापूरच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. 

या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, राजेश घुन्नर, मृत्युंजय दुत गोविंद टेकाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी भिमराव राठोड, पोउनी कैलास पवार, तुकाराम बोधमवाड, सतिष लहानकर, विजय कदम, संभाजी गोहरकर आदींनी परिश्रम घेतले.

कर्त्याव्यक्तीच्या निधनाने कुटुंब उघड्यावरदाती ( ता.कळमनुरी जिल्हा हिंगोली ) येथील बाबुराव मारोतराव पतंगे यांची मुलगी सिमा हिच्याशी लक्ष्मण यांचा १४ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना १३ वर्षाचा देवांश व ११ वर्षाचा दर्शन ही दोन मुले आहेत. सेवक पदावर ते नायगाव येथे कार्यरत होते.त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने  कुटुंब उघड्यावर पडले आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड