शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

'हायवा'च्या जबर धडकेत दुचाकीवरील एकजण ठार; तर दुसरा गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 19:24 IST

नांदेड ते लातूर महामार्गावरील मुसलमानवाडी पाटी शिवारातील मुख्य रस्त्यावर अपघात

नांदेड: हायवाच्या जोरदार धडकेने एक ३४ वर्षीय तरूण जागीच ठार झाला, तर दुसरा एकजण गंभीर झाला. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्यादरम्यान नांदेड ते लातूर महामार्गावरील मुसलमानवाडी पाटी शिवारातील मुख्य रस्त्यावर घडली आहे.

नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावरील खरबी येथील रहिवासी रामजी शंकरराव पवार तसेच हनुमंत किशन हिवंत हे दोघे ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास (एमएच-२६ एक्यू-७९१२) दुचाकीवर नांदेडच्या दिशेने येत होते. त्याचवेळी, त्यांच्या पाठीमागून भरधाव येणाऱ्या एमएच-०८, एपी- ०५८२ या हायवा ट्रकच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे व भरधाव चालवून दुचाकीस पाठीमागून जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होवून रामजी पवार हे जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबतचे हनुमंत हिवंत या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती समजताच सहायक पो. नि. श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. बालाजी नरवटे, बीट हेडकॉन्स्टेबल अतूल सातारे व अंमलदार किशोर इंगळे यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेवून घटनास्थळ पंचनामा केला. त्याचवेळी, घटनास्थळावरून हायवा ट्रक ताब्यात घेवून मयत पवार यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली. या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या हनुमंत हिवंत यांच्यावर विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल सातारे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली आहे.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात