शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: मन सुन्न झालं! मुलाने जीवन संपवल्याच्या धक्क्यात वडिलांचा मृत्यू, आईला हार्टअटॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:16 IST

एकुलत्या एक मुलाने घेतले टोकाचे पाऊल, हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचा मृत्यू; दुहेरी आघाताने हार्टअटॅक येऊन आई रुग्णालयात दाखल

- गोविंद कदमलोहा: तालुक्यातील सावरगाव  (न) येथे अवघ्या ४८ तासांत हसतं खेळतं कुटुंब संपल्याने अख्ख गाव सुन्न झाले आहे. एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराहून घरी येताच अवघ्या काही तासांत वडिलांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर दुःखाचा दुहेरी आघात झाल्याने आईला देखील हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राहुल बेद्रे (वय २७)आणि भीमराव बेद्रे (वय ६०) असे मृत बापलेकाचे नाव आहे. तर शोभाबाई बेद्रे यांच्यावर नांदेड येथिल खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सावरगाव येथील भीमराव बेद्रे यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी अपत्य होत. त्यांना ४ एकर कोरडवाहू शेती आहे. राहुल हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो घरची शेती कसण्यासोबत मोलमजुरी करून वडिलांना हातभार लावत होता. सोमवारी ९ जून रोजी त्याने दिवसभर आपल्या मित्रांसोबत रोजंदारीने ट्रकमध्ये कापूस भरण्याचे काम केले. त्यानंतर शेतात जाऊन येतो म्हणून तो गेला होता. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. गावकऱ्यांनी शोध घेतला असता शेतातील एका झाडाला त्याने गळफास घेतल्याचे समोर आले.

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूचा धक्काराहुलने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र एकुलत्या एक मुलाने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने वडील भीमराव बेद्रे यांना धक्का बसला. १० जुन रोजी मंगळवारी मुलाच्या अंत्यविधीनंतर घरी येताच भीमराव बेद्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र, १२ जूनला पहाटे पुन्हा हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

आईवर एकाचवेळी दुहेरी आघातदरम्यान, मुलापाठोपाठ पतीचाही मृत्यू झाल्याच्या दुहेरी आघाताने शोभाबाई देखील खचून गेल्या. त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याने शोभाबाई पतीचं अंतिम दर्शनही घेऊ शकल्या नाहीत. गावकऱ्यांनीच काही नातेवाईकांच्या उपस्थितीत भीमराव यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अवघ्या ४८ तासांत या दु:खद घटनाक्रमामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून, "हसतं-खेळतं कुटुंब डोळ्यासमोर उध्वस्त झालं" अशा भावना गावकरी व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडfarmer suicideशेतकरी आत्महत्याFamilyपरिवारHeart Attackहृदयविकाराचा झटका