शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचाराने सहावीतल्या मुलाला बसला मानसिक धक्का; शाळा बंद, जेवण सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 17:49 IST

शेजारीच राहत असलेल्या दहावीतील मुलाने संधी साधत सहावीतील मुलाच्या घरी येऊन धमकावित केले लैंगिक अत्याचार.

नांदेड : साधारणता मुलींवर लैंगिक अत्याचार केले जातात असा समज आहे. परंतु नुकतेच एका घटनेत सहावीतील मुलावर त्याच्या शेजारीच राहत असलेल्या दहावीतील मुलाने तीन वेळा लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे मुलाला मानसिक धक्का बसला होता. शाळेत जाणेही बंद केले होते. तसेच जेवणही सोडले होते. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव घेतली. त्यावेळी मुलाने आपबिती सांगितल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. सध्या या मुलावर मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत.

मुलाचे आई आणि वडील हे दोघेही शासकीय कर्मचारी आहेत. त्यामुळे सकाळीच ते कामावर निघून जातात. मुलगा दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर एकटाच असतो. मुलगी असल्यास आई-वडील विशेष काळजी घेतात. परंतु मुलगा असल्यामुळे त्याला कोण करणार? अशी भावना असते. परंतु हीच संधी साधून शेजारीच राहत असलेल्या दहावीतील मुलाने पीडित मुलाच्या घरी येऊन धमकावित त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे मुलाला मानसिक धक्का बसला. झोपेत अचानक दचकणे, शाळेत जाण्यास नकार, खाणे-पिणे सोडणे अशी लक्षणे त्याच्या दिसून आली. त्यानंतर कुटुंबीयांनी लगेच मानसोपचार तज्ज्ञाकडे धाव घेतली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आजघडीला या मुलावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत.

मुलांनाही लैंगिक शिक्षणाची गरजमुलीच लैंगिक अत्याचाराला बळी पडतात असा अनेकांचा समज आहे. परंतु मुलांसोबतही अत्याचाराच्या घटना घडतात. त्यामुळे मुलींसोबत मुलांनाही लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे. समाजात घडणाऱ्या वाईट प्रवृत्तीची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा घटना टाळता येतील. त्यासाठी पालकांनी अधिक जागरुक राहण्याची गरज आहे. -डॉ. रामेश्वर बाेले, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी