८६ वर्ष वयाच्या योध्द्याने केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST2021-04-27T04:18:22+5:302021-04-27T04:18:22+5:30
मागील अनेक दिवसांपासून शुगर, बीपी, अस्थमा यांसारखे प्रदीर्घ आजार असताना त्यांना मध्येच कोरोनाने गाठले. घरात आधीच एक कोरोना रुग्ण ...

८६ वर्ष वयाच्या योध्द्याने केली कोरोनावर मात
मागील अनेक दिवसांपासून शुगर, बीपी, अस्थमा यांसारखे प्रदीर्घ आजार असताना त्यांना मध्येच कोरोनाने गाठले. घरात आधीच एक कोरोना रुग्ण होता. मुलगा श्याम हे आईच्या सेवेत एका कोविड सेंटरमध्येच होते. तेवढ्यात वडिलांना रक्ताच्या उलट्या झाल्या म्हणून त्यांच्या मित्रमंडळींनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नंतर त्यांची कोविड चाचणी केली. ती पॉझिटिव्ह येताच त्यांना कोविड सेंटरला हलविण्यात आले. पेशंटचे वय आणि इतर आजार पाहून डॉक्टरांनी नातेवाईकांना अगोदरच सूचना केल्या. कारण रुग्णाचे वय, त्यांचे इतर आजार उपचारासाठी कसे प्रतिसाद देतात, यावर सर्वकाही अवलंबून होते. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी केलेल्या परिश्रमाने आणि रुग्णाच्या बिनधास्त स्वभावाने कोरोनाला हरवण्यास मदत झाली.
सतत ९ दिवस हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे रुग्णाला कोविडमधून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश मिळाले.
केवळ इच्छाशक्ती आणि योग्य उपचाराच्या भरवशावर त्यांनी कोरोनावर मात केली. सोबतच ७८ वर्षांच्या भागीरथीबाई गणपतराव वडजे यासुद्धा कोरोनावर मात करून घरी सुखरूप परतल्या. वयोवृद्ध आई आणि वडिलांनी भयंकर आजारावर मात केल्याचे समाधान मुलगा श्याम पाटील वडजे आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावर दिसत होते.