शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

भोकरमध्ये ट्रव्हल्सच्या अपघातात ८ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 15:05 IST

नांदेड ते भोकर मार्गावर चालणाऱ्या खाजगी ट्रव्हल्ससचा आज सकाळी अपघात होऊन ८ प्रवासी गंभीर तर ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना भोकरपासून २ किमीवर सकाळी ९ वाजता घडली. गंभीर जखमींना नांदेड येथे हलवण्यात आले आहे. 

भोकर (नांदेड ) : नांदेड ते भोकर मार्गावर चालणाऱ्या खाजगी ट्रव्हल्ससचा आज सकाळी अपघात होऊन ८ प्रवासी गंभीर तर ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना भोकरपासून २ किमीवर सकाळी ९ वाजता घडली. गंभीर जखमींना नांदेड येथे हलवण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, आज सकाळी नांदेड ते भोकर मार्गावर खाजगी प्रवासी वाहतूक करणा-या ट्रव्हल्सचे ( एम.एच.०५ आर ०४२ ) पुढील टायर अचानक फुटले. यामुळे ट्रव्हल्स एका झाडावर आदळून अपघात झाला. यात १२ जण जखमी झाले. यातील बाबाराव सीताराम मारकळ (४५) रा.जंगमवाडी नांदेड, बालाजी गणपतराव सोनटक्के (४५) रा.भोकर, आत्माराम तुकाराम जाधव (५०) रा.नांदेड, शिवाजी रामराव जाधव (४५) रा.भोकर, सुधीर दत्तात्रय अंबेकर (४६) रा. नांदेड, बालु सायलु पवळे (४६) रा.नांदेड, दत्तात्रय दामोदर पांचाळ (४३) रा. नांदेड, किशन भुजंगराव आंबटवार (४६) रा. नांदेड हि गंभीर जखमी झाली आहेत. तर किरकोळ जखमी असलेली अमंन गोविंदराव सामनकर, सदाशिव हरीभाऊ काळे, चक्रधर दत्तात्रय खामसाळे, रमेश किशनराव भुरे (सर्व रा.नांदेड) यांच्यावर उपचार करून घरी पाठवण्यात आले. 

कमी भाडे आकारतात जखमींमध्ये नांदेड - भोकर रोज येणेजाणे करणा-या शिक्षकांची संख्या जास्त आहे. भोकर ते नांदेड बस भाडे  ५८ रुपये असून खाजगी वाहनधारक ३० ते ४० रुपय भाडे आकारतात. यामुळे यामार्गावर खाजगी प्रवासी वाहतूकीस  मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळतो. 

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड