शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील ७९ प्राध्यापक सातव्या वेतन आयोगाविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 20:38 IST

वेगवेगळे नियम लागू झाल्याने वेतनासाठी विलंब 

ठळक मुद्देप्राध्यापकांचे २ डिसेंबरपासून सहसंचालक कार्यालयासमोर उपोषण

नांदेड/औरंगाबाद : एकाच निवड समितीने निवड केलेल्या प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात मात्र वेगवेगळे नियम लावले जात आहे. या नियमामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ७९ प्राध्यापक सातव्या वेतन आयोगापासून अद्यापही वंचित राहिले आहेत. याबाबत आता प्राध्यापकांनी २ डिसेंबरपासून उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

नांदेडमध्ये १७ सप्टेंबर १९९४ मध्ये स्थापन झालेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तत्कालीन कुलगुरुंच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्राध्यापकांची निवड केली होती. या निवड समितीमध्ये कुलपती म्हणजेच राज्यपालांचे प्रतिनिधी उपस्थित होते.   उच्च शिक्षण विभागाचा प्रतिनिधी कोणत्याही मुलाखतीच्यावेळी उपस्थित असणे बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

उच्च शिक्षण विभागाचा प्रतिनिधी स्वारातीम विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवडीदरम्यान अनुपस्थित असल्याचे कारण देत  नांदेड विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून ७९ प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग मंजूर केला नाही. पण त्याचवेळी इतर १७ प्राध्यापकांना मात्र सातवा वेतन आयोग लागू केला आहे, हे विशेष!  सहसंचालक कार्यालयाकडून दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला आहे.

... तर त्यात प्राध्यापक मंडळीचा काय दोष?- चव्हाणच्एकाच निवड समितीसमोर मुलाखत दिलेल्या प्राध्यापकांपैकी काही जणांना सातवा वेतन आयोग लागू होतो अन् काही जणांना नाही, ही बाब निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. विद्यापीठ भरती प्रक्रियेत राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून कुलगुरू हे समितीचे अध्यक्ष म्हणून मुलाखती घेत असतात. ही वस्तुस्थिती आहे. जर निवड प्रक्रियेत शासन प्रतिनिधी नसेल तर त्यात प्राध्यापक मंडळीचा काय दोष आहे? असा प्रश्न असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सहसंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

वंचित ठेवणे चुकीचे स्वारातीम विद्यापीठातील प्राध्यापकांना राज्यपालाच्यावतीने एकाच निवड समितीद्वारे मुलाखती घेवून विद्यापीठामध्ये समाविष्ट केले आहे. हे प्राध्यापक विद्यापीठाच्या सेवेत कार्यरत आहेत.असे असताना शासन प्रतिनिधी नसल्याची बाब पुढे करुन सातव्या वेतन आयोगापासून त्यांना वंचित ठेवणे चुकीची असल्याची बाब पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांनी उच्च शिक्षण सहसंचालकांना लिहिलेल्या पत्रात नमूद केली.

प्रस्ताव पाठवले आहेत स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने राज्यात सर्वात अगोदर प्राध्यापकांची सातव्या वेतन आयोगासाठीची वेतननिश्चिती केली आहे. हे प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहे. मात्र विद्यापीठातील प्राध्यापकांचे प्रस्ताव अद्याप मंजूर झाले नाही. त्यात या प्रकरणात उच्च शिक्षण विभाग तोडगा काढेल, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दिली.

त्रुटी पुढे आल्या आहेत नांदेड विभागीय उच्चशिक्षण विभागाचे प्रभारी सहसंचालक डॉ. बळीराम लहाने यांच्याशी संपर्क साधला असता सातव्या वेतन आयोग न मिळालेल्या प्राध्यापकांच्या निवड समितीमध्ये उच्चशिक्षण विभागाचा प्रतिनिधी नसल्याची त्रुटी पुढे आल्याचे सांगितले. याबाबत उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांचे मार्गदर्शन आॅक्टोबरमध्येच मागविले आहे. मार्गदर्शन मिळताच निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :swami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडNandedनांदेडProfessorप्राध्यापकfundsनिधीGovernmentसरकार