७५ बाधित तर दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:24 IST2021-02-27T04:24:03+5:302021-02-27T04:24:03+5:30

४६ जणांची कोरोनावर मात जिल्ह्यात शुक्रवारी ४६ जणांनी कोरोनावर मात केली. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ४, एनआरआय व गृहविलगीकरण ...

75 infected and two killed | ७५ बाधित तर दोघांचा मृत्यू

७५ बाधित तर दोघांचा मृत्यू

४६ जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात शुक्रवारी ४६ जणांनी कोरोनावर मात केली. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ४, एनआरआय व गृहविलगीकरण २७, गोकुंदा ४, जिल्हा रुग्णालय १, मुदखेड ४ आणि खासगी रुग्णालयातील सहा जणांचा समावेश आहे. आतापर्यंत २२ हजार १७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १६१ तर जिल्हा रुग्णालयात ४८ खाटा रिक्त आहेत. उपचार घेत असलेल्या १६ जणांची प्रकृती गंभीर आहे.

१८ फेब्रुवारीपासून वाढले रुग्ण

जिल्ह्यात १८ फेब्रुवारीपासून रुग्ण आढळण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. १७ फेब्रुवारीला २४ रुग्ण आढळले होते. १८ फेब्रुवारीला ५८, १९ फेब्रुवारी- ४५, २० फेब्रुवारी- ५६, २१ फेब्रुवारी - ६०, २२ फेब्रुवारी- ५९, २३ फेब्रुवारी- ७६, २४ फेब्रुवारी- ५५, २५ फेब्रुवारी- ७० आणि शुक्रवार २६ फेब्रुवारील ७५ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: 75 infected and two killed