नांदेड परिक्षेत्रातील ७२० गुंड तडिपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:19 IST2021-09-11T04:19:48+5:302021-09-11T04:19:48+5:30
चाैकट.... ५४ ठिकाणे संवेदनशील सण-उत्सवाच्या काळात दंगलीचे रेकाॅर्ड असलेली ५४ ठिकाणे संवेदनशील म्हणून परिक्षेत्रात नाेंद आहेत. त्यातील सर्वाधिक २२ ...

नांदेड परिक्षेत्रातील ७२० गुंड तडिपार
चाैकट....
५४ ठिकाणे संवेदनशील
सण-उत्सवाच्या काळात दंगलीचे रेकाॅर्ड असलेली ५४ ठिकाणे संवेदनशील म्हणून परिक्षेत्रात नाेंद आहेत. त्यातील सर्वाधिक २२ लातूरमध्ये, परभणी १६, नांदेड १३, तर हिंगाेली जिल्ह्यातील ३ ठिकाणांचा समावेश आहे.
चाैकट....
चाैघांवर माेक्का-एमपीडीए
नांदेड परिक्षेत्रातील चार अट्टल गुंडांवर माेक्का, एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. परभणीतील दाेघांवर माेक्का, तर नांदेडच्या दाेघांना एमपीडी अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.
चाैकट....
तगडा पाेलीस बंदाेबस्त तैनात करणार
गणेश विसर्जनाच्या वेळी अखेरच्या तीन दिवसांत नांदेड परिक्षेत्रात तगडा पाेलीस बंदाेबस्त तैनात केला जाणार आहे. स्थानिक पाेलिसांच्या दिमतीला राज्य राखीव पाेलीस दलांच्या तीन कंपन्या, दाेन प्लाटून व ३,२०० हाेमगार्ड तैनात केले जाणार आहेत. याशिवाय बाहेरून ३२५ प्रशिक्षणार्थी पाेलीस कर्मचारी, फाैजदार ते उपअधीक्षक असे ५० अधिकारी बाेलविण्यात येणार आहेत. हाेमगार्डमध्ये ५०० महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.