७१ हजार व्यक्तींना सहव्याधी, तातडीने घ्यावे लागणार उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:22+5:302021-06-01T04:14:22+5:30
एकूण कुटुंब संख्या ४,८९,४७९ किती कुटुंबांचे झाले सर्वेक्षण ४,८९,४७९ सर्वेक्षणासाठी नियुक्त पथके ८९५ पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या २,३६७ चौकट ...

७१ हजार व्यक्तींना सहव्याधी, तातडीने घ्यावे लागणार उपचार
एकूण कुटुंब संख्या ४,८९,४७९
किती कुटुंबांचे झाले सर्वेक्षण ४,८९,४७९
सर्वेक्षणासाठी नियुक्त पथके ८९५
पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या २,३६७
चौकट ---
मुदखेड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणातून जिल्ह्याचा आरोग्य डाटा उपलब्ध झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील तब्बल ७१ हजार ४७८ जणांना मधुमेह, हृदयविकारासारख्या व्याधी असल्याचे पुढे आले. यामध्ये सर्वाधिक ७ हजार ८६ रुग्ण मुदखेड तालुक्यात आढळले आहेत. त्या पाठोपाठ ६ हजार १८९ रुग्ण हे हदगाव तालुक्यातील आहेत. तर नांदेड शहरात ६ हजार ६२८ जणांना अशा प्रकारच्या व्याधी असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले.
पुढे काय?
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतून पुढे आलेली आकडेवारी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहे. या रुग्णांना उपचारासाठीची सुविधा उपलब्ध करून देतानाच भविष्यात रुग्णालयाचे नियोजन करतानाही ही आकडेवारी उपयोगी ठरणारी आहे. याबरोबरच कोणत्या आजारावर लक्ष केंद्रित करायला हवे या दृष्टीनेही हा डाटा दिशादर्शक आहे.