जिल्ह्यात ७ नवे रुग्ण, २० जणांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:37+5:302021-07-02T04:13:37+5:30

जिल्ह्यात गुरुवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही समाधानकारक बाब आहे. जिल्ह्यात २० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात ...

7 new patients in the district, 20 have overcome coli coli | जिल्ह्यात ७ नवे रुग्ण, २० जणांनी केली कोरोनावर मात

जिल्ह्यात ७ नवे रुग्ण, २० जणांनी केली कोरोनावर मात

जिल्ह्यात गुरुवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही समाधानकारक बाब आहे. जिल्ह्यात २० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात गृहविलगीकरणातील सर्वाधिक ७ रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालय ४, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १, अर्धापूर तालुका ७ आणि खाजगी रुग्णालयातील एक रुग्णही बरे झाल्याने घरी परतला आहे. आतापर्यंत ८८ हजार ६३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात सध्या ११७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाच रुग्णांवर उपचार सुरू असून जिल्हा रुग्णालयात १२, मुखेड कोविड सेंटरमध्ये ३, देगलूर २ आणि खाजगी रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू आहे. नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरणात ५५ आणि जिल्ह्यात विविध तालुक्यांतर्गत ३९ रुग्ण घरीच राहून कोरोनावरील उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१३ टक्क्यावर पोहोचले आहे.

Web Title: 7 new patients in the district, 20 have overcome coli coli