नांदेड शहराच्या विकासासाठी ६५० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:19 IST2021-07-27T04:19:13+5:302021-07-27T04:19:13+5:30
जिल्ह्यातील खड्ड्यांबाबत बोलताना राजूरकर यांनी भारतीय जनता पार्टीचे सध्याचे अध्यक्ष आणि तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळातील खड्डे बुजविण्याचे ...

नांदेड शहराच्या विकासासाठी ६५० कोटींचा निधी
जिल्ह्यातील खड्ड्यांबाबत बोलताना राजूरकर यांनी भारतीय जनता पार्टीचे सध्याचे अध्यक्ष आणि तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळातील खड्डे बुजविण्याचे काम आम्हाला करावे लागत असल्याचे स्पष्ट केले. पाटील यांच्या कार्यकाळात कोणत्याही रस्त्यांची कामे झाले नाहीत. परिणामी, रस्त्यांची दुरवस्था झाली. हे खड्डे बांधकाममंत्री म्हणून आता चव्हाण यांना बुजवावे लागत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
समृद्धी महामार्गासाठी आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत भूसंपादनाचे वेगवेगळे आराखडे तयार केले जात आहेत. यातून एक आराखडा अंतिम केला जाईल. त्यानंतर, भूसंपादन प्रक्रियेला प्रारंभ होईल. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनातूनच बुलेट ट्रेनचा मार्ग तयार करण्याबाबतही विचार सुरू आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनसाठी वेगळ्याने भूसंपादन करायची गरज भासणार नाही. समृद्धी महामार्गानंतर जिल्ह्याची दळणवळण व्यवस्था गतिमान होईल, यातून विकासाला चालना मिळेल, असा विश्वास राजूरकर यांनी व्यक्त केला. पालकमंत्री चव्हाण हे नांदेडसह मराठवाड्याच्या विकासाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून काम करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.