नांदेड मनपात ६४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:37 AM2018-10-17T00:37:54+5:302018-10-17T00:38:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : महापालिकेच्या तब्बल ६४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या तडकाफडकी करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या झाल्याचे ...

64 employees shifted to Nanded Mandal | नांदेड मनपात ६४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नांदेड मनपात ६४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Next
ठळक मुद्देवर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांना झटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेच्या तब्बल ६४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या तडकाफडकी करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले असले तरी अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे त्या त्या विभागात ठाण मांडून होते तर काही कर्मचाऱ्यांना कामच उरले नव्हते. परिणामी महापालिकेला काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वेतन अदा करावे लागत होते.
महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामाचा विषय हा एकूणच संशोधनाचाच आहे. याबाबत आयुक्तांकडेही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्त लहुराज माळी यांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्याचे आदेश उपायुक्त गीता ठाकरे आणि सहायक आयुक्त माधव मारकड यांना दिले होते. या आदेशानंतर लिपिक, शिपाई, जकात जवान, जकात निरीक्षक, मजूर, सफाई कामगार, कंत्राटी डाटा आॅपरेटर, माळी, माळण आदी वर्ग ३ व ४ च्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर १५ आॅक्टोबर रोजी बदल्याचे आदेशाचे निर्गमित करण्यात आले आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात येत असून याच आदेशाने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
या बदल्यामध्ये विधि विभागाचे सहायक आयुक्त श्रीकृष्ण झाकडे यांना भूसंपादन विभागात बदलीवर पाठविण्यात आले आहे तर अविरत विभागाच्या वरिष्ठ लिपिक सुजाता वाडीयार यांची बदली अभिलेख विभागात, मालमत्ता विभागातील लिपिक दिनेश सर्कलवाड यांची अभिलेख विभागात, पाणीपुरवठा विभागातील लिपिक स्वानंद देशपांडे यांची संगणक विभागात, लेखा विभागातील लिपिक अश्विनी देवडे यांची मालमत्ता विभागात, तरोडा झोन कार्यालयातील लिपिक नेहा जीवतोडे यांची मालमत्ता विभागात, आवक-जावक विभागातील लिपिक माधव ठमके यांची भांडार विभागात, सिडको झोन कार्यालयातील लिपिक रामदास कलवले यांची जनगणना विभागात, पाणीपुरवठा विभागातील लिपिक बालाप्रसाद सुंकेवार यांची मुलेख विभागात लेखा विभागातील लिपिक दीपक कनोजिया यांची आस्थापना विभागात, आस्थापना विभागातील लिपिक वसंत पवार यांची सामान्य प्रशासन विभागात, सिडको झोन कार्यालयातील जकात जवान संदीप घोंगडे यांची आस्थापना विभागात, नगररचना विभागातील शिपाई रमेश पाथरकर यांची वाचनालय विभागात अशोकनगर झोनमधील शिपाई मिर्झा अकबर बेग यांची मनपा शाळा खय्युम प्लॉट येथे तर मधुकर कल्याणकर यांची शिक्षण व महिला बालकल्याण कमिती कक्षात, म. खाजा म. अजीज यांची इस्लामपुरा आयुक्त कक्षातील लिपिक अशोक जवादे यांची आलेप विभागात, कर विभागातील मजूर विजय झडते यांची विद्युत विभागात, सिडको झोनमधील मजूर सुमनबाई बहादुरे यांची वाचनालयात तर स्वच्छता विभागातील मजूर प्रभाकर जोंधळे यांची स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील मनपा शाळेत, मजूर प्रकाश खंदारे यांची कौठा येथील मनपा रुग्णालयात बदली करण्यात आली आहे.
जकात निरीक्षक सुरेश कुलकर्णी यांची शिवाजीनगर झोन कार्यालयातून इतवारा क्षेत्रीय कार्यालयात बदली करण्यात आली आहे. तरी आस्थापना विभागातील लिपिक सविता मुलंगे यांची शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयात मालमत्ता विभागातील लिपिक ओंकार स्वामी यांची वजिराबाद झोन कार्यालयात बदली करण्यात आली आहे. उद्यान विभागातील कर्मचारी प्रतिनियुक्तीने इतरत्र काम करत होते. त्यांना या आदेशान्वये मूळ पदावर पाठविण्यात आले आहे. तब्बल १७ कर्मचारी उद्यान विभागाला या आदेशान्वये मिळाले आहेत. त्यामुळे उद्यान विभागातील कामाला आता गती मिळणार आहे. त्याचवेळी काम नसतानाही त्या त्या विभागात ठाण मांडलेल्या कर्मचाºयांना आता या आदेशान्वये काम लागणार आहे.

Web Title: 64 employees shifted to Nanded Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.