शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
2
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
3
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
4
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
5
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
6
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
7
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
8
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
9
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
10
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
11
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
12
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
13
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
14
Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
15
Uma Bharti : "लाजिरवाणं, अत्यंत कलंकित; आयुष्याची किंमत २ लाख..."; उमा भारतींचा भाजपाला घरचा आहेर
16
PHOTOS: लग्नाच्या रोमान्सनंतर थेट टेनिस कोर्टवर... ४५ वर्षांची व्हीनस विल्यम्स रचणार इतिहास
17
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
18
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
19
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
20
८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड मनपा निवडणूक अर्ज छाननीत ५९ उमेदवार बाद; ८७८ अर्ज वैध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:07 IST

आता उमेदवारी मागे घेण्याकडे लागले लक्ष

नांदेड:  नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत तब्बल ५९ नामनिर्देशन पत्र विविध कारणावरून बाद ठरली आहेत. महापालिकेच्या ८१ जागांसाठी आता ८७८ उमेदवार रिंगणात असून अर्ज माघारीनंतर नेमके किती जण निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल.

महापालिकेसाठी एकूण सात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये थाटले असून दि.२३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत ३ हजार ७१५ अर्जाची उचल करण्यात आली होती. प्रारंभिक पाच दिवसात केवळ ३८ अर्ज दाखल झाले होते. २९ डिसेंबर रोजी २६५ तर ३० डिसेंबर रोजी अंतिम तारखेस तब्बल ९०१ अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले होते. एकूण १२०३ नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया विविध कार्यालयात ३१ डिसेंबर रोजी दिवसभर पार पडली. त्यात एकूण ९३७उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ८७८ अर्ज वैध ठरले.

अधिकृत एबी फॉर्म जोडलेल्यांचीही मनधरणीज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा अनेकांनी दुसऱ्या पक्षाचा आधार घेत एबी फॉर्म जोडले आहेत. त्यांची ही बंडखोरी रोखण्यासाठी आणि त्यांनी माघार घ्यावी, यासाठी पक्षश्रेष्ठींकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच ज्यांना ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशा नाराजांची नाराजी दूर करत त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत विविध पदावर नियुक्त्या दिल्या जात आहेत.

बिलोली पॅटर्न नांदेडातही; मजपा उतरली रिंगणातनगरपालिका निवडणुकीत नव्यानेच स्थापन झालेल्या मराठवाडा जनहित पार्टीने धर्माबाद, बिलोलीमध्ये चांगले यश मिळवले. तर भोकरमध्ये चार जागा मिळविल्या आहेत. हाच बिलोली पॅटर्न आता नांदेड महापालिकेतही राबविला जात असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही अथवा ज्यांनी घेतली नाही, अशा बहुतांश जणांनी मराठवाडा जनहित पार्टीचा आधार घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी महापौर त्रिशला धबाले यांचे पती विलास धबाले यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी मराठवाडा जनहित पार्टीकडून उमेदवारी दाखल केली असून त्यांचे नामनिर्देशन पत्र छाननीअंती वैध ठरले आहेत. एकूण किती उमेदवार मजपाने दिले, हे दोन दिवसात कळेल.

सर्वाधिक वैध अर्ज कार्यालय क्रमांक १ मध्येप्रती ३ प्रभागांसाठी १ स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्थापन केले आहे. प्रभाग क्रमांक १, २ व ३ मधून प्राप्त अर्जापैकी १४७ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली, तर दोन अर्ज बाद झाले. प्रभाग क्रमांक ४, ५, ९ मधून १३१ अर्ज वैध तर १६ अवैध ठरली. प्रभाग क्रमांक ६, ७, ८ मधून १४३ अर्ज वैध तर २ बाद ठरले. प्रभाग क्रमांक १०, ११, १२ मध्ये १०० अर्ज वैध तर १२ अवैध ठरले. प्रभाग क्रमांक १३, १४, १५ मधून १५१ उमेदवारी अर्ज वैध तर ४ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली. प्रभाग क्रमांक १६, १७, १८ मधून ११६ अर्ज वैध तर २० अर्ज बाद ठरले. प्रभाग क्रमांक १९ व २० मध्ये ९० अर्ज वैध तर ३ अवैध ठरली. एकूण अवैध अर्जाची संख्या ५९ आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Municipal Elections: 59 Nominations Rejected; 878 Applications Valid

Web Summary : 59 nominations were rejected in Nanded Municipal Corporation elections. 878 candidates remain for 81 seats. Parties attempt to reconcile with unselected candidates. Marathwada Janhit Party fields candidates after success in other areas.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Nanded Waghala Municipal Corporation Electionनांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूक २०२६