शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कंधार तालुक्यातील ५४ शाळा क्रीडांगणाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:40 IST

नादुरुस्त व धोकादायक वर्गखोल्याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत असताना अध्ययनाने आलेला बौद्धिक, मानसिक थकवा दूर करणारा खेळ खेळण्यासाठी ५४ शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडांगण नाही.

ठळक मुद्देक्रीडाक्षेत्रात मरगळ जिल्हा परिषदेचा कानाडोळा

कंधार : तालुक्यात जि.प.शाळांची संख्या १८८ आहे. नादुरुस्त व धोकादायक वर्गखोल्याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत असताना अध्ययनाने आलेला बौद्धिक, मानसिक थकवा दूर करणारा खेळ खेळण्यासाठी ५४ शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडांगण नाही. त्यामुळे खेळाचा आनंद लुटता येत नाही.तालुक्यातील जि.प.शाळा ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांना मोठा आधारवड देणारे, संस्कारमय, नीतिमूल्ये संवर्धन केंद्र मानले जाते. परंतु, या शाळा नानाविध भौतिक सुविधेअभावी चर्चेत येत असल्याचे चित्र आहे. ८५९ वर्गखोल्या असलेल्या या शाळा मोठ्या प्रमाणात नादुरुस्त, धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. पालकांना शेती, मजुरीपेक्षा सारे लक्ष शाळेतील मुलांकडे देण्याची वेळ आली आहे. त्यातच अध्ययनाने आलेला बौद्धिक, मानसिक थकवा दूर करण्यासाठी मैदानाचा अभाव असल्याने नवीन भर पडली आहे.तालुक्यातील ५४ शाळेला क्रीडांगण नाही. खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठा वाव असतो. सुप्तगुणांचा विकास, नेतृत्व, सांघिक भावना, खिलाडूवृत्ती, रोग प्रतिकार शक्ती वाढते, राष्ट्रीय एकात्मता, भावनिक विकास, शारीरिक क्षमतेचा विकास, निर्णय क्षमतेचा विकास आदी गुणांचा विकास होतो. शालेयस्तरावर मूलभूत कौशल्य शिकून खेळातील नवीन तंत्रे अवगत करत देशाचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर करता येते. आपल्या आवडीनुसार खेळ निवडून प्रावीन्य संपादित करता येते.खेळ कौशल्याचा पाया शालेयस्तरावर घातला जातो. परंतु मैदान नसल्याने खेळात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. अशीच स्थिती या शाळेतील विद्यार्थ्यांची झाली आहे. आॅलिम्पिक सारख्या जागतिक क्रीडा महोत्सवात भारताची स्थिती समाधानकारक नाही.मैदान असले तर क्रीडा साहित्य नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ओढाताण होते. क्रीडा मार्गदर्शक योग्य मिळण्याची सोय नाही. मग क्रीडांगण नसेल तर सराव कसा करायचा? हा खरा प्रश्न आहे.शाळांच्या समस्या संपेनात !एकीकडे मैदान नसताना जि.प.च्या ९९ शाळांना सरंक्षक भिंत नाही. रात्री मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनण्याचा धोका वाढला आहे. वृक्ष लागवड केली ; पण त्याचे संवर्धन करणे कठीण होत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांना जशा समस्या भेडसावत आहेत. तसेच ९० पेक्षा अधिक जि.प. शाळेत कार्यालय, भांडार व मुख्याध्यापक खोली नसल्याने अडचणीचा ससमिरा सहन करावा लागत आहे. खाजगी अनुदानित व विना अनुदानित शाळा पायाभूत भौतिक सुविधेत जरा बºया आहेत. परंतु खाजगी अनुदानित ८४ शाळेपैकी काही शाळेला संरक्षक भिंत नाही. तसेच मोजक्या शाळेला क्रीडांगण नाही.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणSchoolशाळा