किराणा दुकानातून ५० हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:47+5:302021-05-01T04:16:47+5:30
मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळेगाव बीटमध्ये तक्रारदाराने एका पोलीस कर्मचाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. ही घटना २९ एप्रिल रोजी ...

किराणा दुकानातून ५० हजार लंपास
मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळेगाव बीटमध्ये तक्रारदाराने एका पोलीस कर्मचाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. ही घटना २९ एप्रिल रोजी घडली. प्रभाकर संभाजी कदम हे माळेगाव येथील बीट कक्षात असताना आराेपी इस्माईल शादूल साब शेख हा त्या ठिकाणी आला. यावेळी त्याने मी तक्रार दाखल केलेल्या आरोपींना अटक का केली नाही म्हणून कदम यांच्यासोबत वाद घातला. यावेळी कदम यांनी या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षकांकडे असल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या इस्माईल शादूल याने कदम यांना शिवीगाळ केली. या प्रकरणात मरखेल पाेलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
शेतातील जुगार अड्ड्यावर धाड
देगलूर तालुक्यातील मौजे कावळगाव शिवारात शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. २९ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी तिर्रट नावाचा जुगार सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरून २ हजारांचे साहित्य जप्त केले. या प्रकरणात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.