नांदेड : मरखेल ते तुंबरपल्ली रस्त्यावर कंटेनर पकडून त्यातील १ कोटी २० लाख रुपयांचा सुंगधित जर्दा पोलिसांनी जप्त केला़ मरखेल पोलिसांच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे़ या प्रकरणात पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले़२२ डिसेंबर रोजी रात्री मरखेलचे पोनि़सी़जीग़ुंगेवाड हे कर्मचाऱ्यांसह पेट्रोलिंग करीत होते़ त्याचवेळी मरखेल ते तुंबरपल्ली रस्त्यावर (यु़पी़१४, एफ़टी़७१९८) या क्रमांकाचा आयचर कंटेनर जात असताना पोलिसांनी तो अडविला़ यावेळी चालकाजवळील कंटेनरची कागदपत्रे तपासणी केल्यानंतर कंटेनरची तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये बाबा १२० या प्रतिबंधित सुंगधित जर्दाची पोती कंटेनरमध्ये असल्याचे आढळून आले़ त्यानंतर पोलिसांनी हा कंटेनर मरखेल ठाण्यात आणला़ या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांसमक्ष या जर्दाची मोजणी करण्यात आली असून १ कोटी २० लाख ४४ हजार ५४१ रुपयांचा माल असल्याचे आढळून आले़ याप्रकरणी पोलिसांनी महेश बिशकर्मा (रा़रोनग्राम, मध्यप्रदेश) या चालकाला अटक केली़ विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी याच रस्त्यावर पोलिसांनी ७५ लाख रुपयांचा गुटखा पकडला होता़ तेलंगणा-कर्नाटकातून राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुंगधित तंबाखूची तस्करी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे़
सव्वा कोटी रुपयांचा सुगंधी जर्दा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:04 IST
मरखेल ते तुंबरपल्ली रस्त्यावर कंटेनर पकडून त्यातील १ कोटी २० लाख रुपयांचा सुंगधित जर्दा पोलिसांनी जप्त केला़ मरखेल पोलिसांच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे़ या प्रकरणात पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले़
सव्वा कोटी रुपयांचा सुगंधी जर्दा पकडला
ठळक मुद्देकंटेनर जप्त : सीमा भागातून होते तस्करी