शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:45 IST

येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहाला स्वत:ची जागा नसल्याने तब्बल ५० वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. वसतिगृहाचे वार्षिक भाडे ७० हजार रुपये व वीज बिल वेगळे असे अंदाजे ९० हजार रुपये शासनाला मोजावे लागतात. ५० वर्षांचे भाड्यापोटी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत.

ठळक मुद्देधर्माबाद : भाड्यापोटी वसतिगृहावर दरवर्षी लाखोंचा खर्चडॉ.आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह

लक्ष्मण तुरेराव।धर्माबाद : येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहाला स्वत:ची जागा नसल्याने तब्बल ५० वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. वसतिगृहाचे वार्षिक भाडे ७० हजार रुपये व वीज बिल वेगळे असे अंदाजे ९० हजार रुपये शासनाला मोजावे लागतात. ५० वर्षांचे भाड्यापोटी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत.धर्माबाद येथे डॉ़बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह सन १९७० मध्ये सुरू झाले. सुरुवातीला वसतिगृह लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या इमारतीत भाड्याने होते. तेथील इमारत मोडकळीस आल्यामुळे शहरातील आंध्रा बसस्थानकजवळील गुजराती यांची इमारत २०१४ मध्ये भाड्याने घेण्यात आली. येथील वार्षिक भाडे ७० हजार रुपये व वीजबिल वेगळे असे अंदाजे ९० हजार रुपये आहे. इमारतीमधील २३ खोल्यांत ७१ विद्यार्थी आहेत़ लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या इमारतीत असताना भाडे कमी होते ; पण त्या ठिकाणी मुलांना शौचालय, स्रानगृहाची व्यवस्था नव्हती़ अनेक सोयीसुविधेचा अभाव होता़ स्वत:चे क्रीडा मैदान नव्हते़ आताही मुलांना खेळण्यासाठी वैयक्तिक मैदान नाही, क्रीडा साहित्य नाही़ सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होत नाहीत़तब्बल ५० वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत असल्याने म्हणाव्या तशा सोय सुविधा मुलांना मिळत नाहीत. कधी पाण्याचा अभाव तर कधी विजेची समस्या, स्वच्छतेचा अभाव, दरवाजे, खिडक्या मोडकळीस असलेले, छतातून पाणी गळणे, शौचालयात स्वच्छतेचा अभाव, कधी जेवणाची समस्या, असे एक ना एक समस्या भाड्याच्या इमारतीत दिसून येतात़ विशेष म्हणजे, मुलांना राहण्यासाठी खोल्या कमी आहेत. एका खोलीत ४-४ मुले असल्याने विविध समस्या निर्माण होत आहेत.शासन मुलाच्या वसतिगृहावर लाखो रुपये खर्च करीत असले तरीही त्याचपद्धतीने भाड्याच्या इमारतीत राहिल्याने दुहेरी लाखोंचा भूर्दंड भरावा लागत आहे़ धर्माबाद येथील शासकीय वसतिगृहासाठी ५० वर्षांपासून जागा शासनाला मिळाली नाही का? आजपर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी वसतिगृहाच्या जागेसाठी पुढाकार घेतलेला नाही़ नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वसतिगृहासाठी जागा मिळाली, इमारतीत बांधून कार्यान्वित झाले, पण धर्माबाद येथील शासकीय वसतिगृहासाठी जागा मिळत नाही, ही शोकांतिका आहे. वसतिगृहात गुणवत्तेनुसार मुलांची निवड केली जाते़ यात सातवी पास, दहावी पास, बारावी पास गुणवत्तेनुसार आणि आयटीआय, डी.एड.ला प्रवेश घेतलेल्या मुलांना प्रवेश दिला जातो़ या वसतिगृहात जेवणाची, राहण्याची, स्टेशनरी, मासिक भत्ता इतर सुविधा शासनाकडून मोफत दिली जाते़

बाळापूर येथील मॉडेल स्कूलसाठी जागा देण्यात आली, ती जागा निवडली होती ; पण त्यामार्गे हायवे रस्ता होत असल्याचे सांगण्यात आल्याने रद्द करण्यात आला़ चार एकर जमीन आम्हाला आवश्यक आहे़ एखादी खाजगी जागा असेल तरीही शासन खरेदी करून जागा ताब्यात घेईल़ आवश्यक जागा मिळत नसल्याने भाड्याच्या इमारतीत राहावे लागते़ यावर पर्याय नाही़ जागेसाठी पाठपुरावा करीत आहोत-

व्ही.बी. झंपलवाड, गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मागासवर्गय वसतिगृह, धर्माबाद

टॅग्स :NandedनांदेडStudentविद्यार्थीEducationशिक्षण