शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील ४५२ गावांना गारपिटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:26 IST

जिल्ह्यातील ४५२ गावांना ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तब्बल २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रांतील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. चार ते पाच दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त होणार आहे.

ठळक मुद्दे२९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र बाधित : नुकसानीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील ४५२ गावांना ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तब्बल २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रांतील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. चार ते पाच दिवसांत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त होणार आहे.जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान १० तालुक्यांत गारपीट झाली. वादळीवा-यासह अवकाळी पाऊसही झाला. या पावसाने एक जण जखमी झाला आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका हदगाव तालुक्याला बसला असून तालुक्यात ७ हजार ७४३ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली. यामध्ये जिरायत क्षेत्र ७ हजार ४६९ हेक्टर, बागायत २५० आणि २४ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल किनवट तालुक्यात २ हजार ९४५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नांदेड तालुक्यात २ हजार ७३९ क्षेत्रातील जिरायत, बागायत व फळपिके बाधित झाली आहेत.धर्माबाद तालुक्यात २ हजार ४०५ हेक्टर क्षेत्रातील पिके गारपिटीने बाधित झाली. बिलोली तालुक्यात २ हजार १९६, नायगाव तालुक्यात १ हजार ८९९, लोहा तालुक्यात १ हजार ६९२, माहूर तालुक्यात २ हजार २२३ हेक्टर, हिमायतनगर तालुक्यात १ हजार १३१ हेक्टर आणि कंधार तालुक्यात १६५ हेक्टर क्षेत्रात शेतीचे नुकसान झाले आहे.नांदेड तालुक्यात १८, धर्माबाद तालुक्यात ५६, नायगाव तालुक्यातील २३, बिलोली तालुक्यातील १२, कंधार तालुक्यातील ३४, हदगाव तालुक्यातील ४४, हिमायतनगर तालुक्यातील ४, किनवट तालुक्यातील ९५ आणि माहूर तालुक्यातील १६६ गावांना गारपिटीचा फटका बसला आहे.जिल्ह्यात गारपीट आणि विजा पडून १३ मोठी जनावरे आणि ९ लहान जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यात २४ हजार ९३५ हेक्टर क्षेत्रातील जिरायत पिकांना गारपिटीचा फटका बसला आहे. तर ४ हजार १७७ बागायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर ५२३ हेक्टर क्षेत्रातील फळपिके जमीनदोस्त झाले आहेत.जिल्ह्यात गत तीन दिवसांत १८ मि़मी़पावसाची नोंद करण्यात आली आहे़ त्यात नांदेड- ५.७५ मिमी., अर्धापूर- १३.६७, मुदखेड- ७.३४, भोकर- ११.७५ मिमी., उमरी-८.००, धर्माबाद- २३.३३, नायगाव- २०.६, बिलोली- १०.८, लोहा- १५.५, कंधार- ६.८३, मुखेड- २१.२८ मिमी., देगलूर- ९.८३, हदगाव १०.०१ मिमी., हिमायतनगर- २.००, किनवट- १८.७१ तर माहूर तालुक्यात १८.०० मिमी. पावसाची नोंद झाली आहे़आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील -जिल्हाधिकारीगारपिटीमुळे अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, मुखेड आणि देगलूर तालुक्यांत कोणतेही नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून केले जात आहेत. हे पंचनामे आठवडाभरात पूर्ण होतील. त्यानंतरच नुकसानीचा अंतिम आकडा हाती येईल, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.४जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत मंगळवारी केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास २३ हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता़ मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढला आहे़