शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाराच्या घरावर दरोडा, मारहाण करत 40 तोळे सोन्यासह 22 लाखाची रोकड केली गायब

By श्रीनिवास भोसले | Updated: June 15, 2024 14:22 IST

कंधार तालुक्यातील कौठा येथे कृषी सेवा केंद्र चालक सहकुटुंब घरी झोपले असता १५ रोजी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास गँस कटरने गेट तोडत  सहा दरोडेखोर तोंडाला रुमाल बांधून घरात घुसले. सुरुवातीला दोघा पती पत्नीचे मोबाईल फोडत व्यापार्यास धमकावले अन् चाकू, राँडने मारहण केली.    

कौठा ता कंधार (जि.नांदेड) - मागील काही दिवसा पासुन कौठा परिसरात चोरट्यांनी जनावरे पाण्याच्या मोटारी पळवल्याच्या घटना ताज्या असतानाच दि १५ जुन रोजी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या व्यापार्याचे घर फोडून ४० तोळे सोनं आणि २२ लाखांची रोकड दरडोखरांनी लांबविल्याची माहिती आहे. ही घटना कंधार पोलीस ठाण्यापासून पासून ३० कि मी अंतरावर असलेल्या कौठा येथे घडली आहे. 

कंधार तालुक्यातील कौठा येथे कृषी सेवा केंद्र चालक सहकुटुंब घरी झोपले असता १५ रोजी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास गँस कटरने गेट तोडत  सहा दरोडेखोर तोंडाला रुमाल बांधून घरात घुसले. सुरुवातीला दोघा पती पत्नीचे मोबाईल फोडत व्यापार्यास धमकावले अन् चाकू, राँडने मारहण केली.    दरोडेखोरांनी सदरील कुटुंबावर प्रचंड दहशत निर्माण करत व्यापार्याच्या उजव्या डोळ्यावर चाकूने तर पायावर राँडने वार करून जखमी करत घरातील सर्व रोख आणि दागिने काढण्यास सांगितले. मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने कुटुंब भयभीत झाले होते आहे, हवे ते घेऊन जा पण मारु नका अशी विनवणी केली. जवळपास 40 तोळे सोने आणि 22 लाखाची रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे. त्याचबरोबर फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्कोडही पाचारण करण्यात आले आहे.

दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद पोलिस कारवाई करण्याची सुध्दा हिमंत कुटुंब दाखवत नव्हते सदरील कुटुंब प्रचंड दहशती खाली असल्याचे दिसत होते दरोडेखोर हे पांढर्या रंगाच्या बेलोरो गाडीत सहा जण गेल्याचे सिसी टिव्ही कॅमेरात कैद झाले. आहेत १९७२ नंतर गावात सर्वात मोठा दरोडा असल्याचे वयस्कर लोक सांगत आहेत घटना घडल्या सात तासाला कंधार पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव घटना स्थळावर आले. दरोडेखोराच्या हल्यामुळे व्यापार्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसGoldसोनं