शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

मालमत्ता कर थकल्याने तीन दिवसांत ३९ भूखंड जप्त; नांदेड महापालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 6:16 PM

महानगरपालिकेकडून नोटिसा देवूनही मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे क्षेत्रीय कार्यालय १ अंतर्गत येणार्‍या ३९ भूखंडावर जप्तीची मनपाने कारवाई केली आहे़ २१ , २२ आणि २३ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईमुळे मालमत्ता न भरणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे़ 

नांदेड : महानगरपालिकेकडून नोटिसा देवूनही मालमत्ता कराचा भरणा न केल्यामुळे क्षेत्रीय कार्यालय १ अंतर्गत येणार्‍या ३९ भूखंडावर जप्तीची मनपाने कारवाई केली आहे़ २१ , २२ आणि २३ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईमुळे मालमत्ता न भरणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे़ 

क्षेत्रीय कार्यालय क्रमांक १ तरोडा, सांगवी अंतर्गत येणार्‍या  मालमत्ता कर भरण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या़ मात्र, या नोटिसानंतरही कर न भरल्यामुळे तरोडा खु़ भागातील गट क्रमांक ५० पैकी प्लॉट क्रमांक १ ते २० चा थकबाकीसह २ कोटी १९ लाख ३५ हजार ३३९ रूपयांचा कर भरला नसल्याने त्यांच्या मालकीचे २० मोकळे भूखंड जप्त करण्यात आले़ तर तरोडा येथील गट ४०, ४१, ५० व ५५ पैकी मालमत्ता क्रमांक १२-८-४९६ चा थकबाकीसह १ कोटी ३० लाख ४६ हजार ८ रूपयांचा कर भरला नसल्याने त्यांचा १ भूखंड जप्त करण्यात आला़

 दरम्यान, २२ जानेवारी रोजी गट क्ऱ ११, १२, १३, १४, १५ व १७ मधील प्लॉट क्र १, ४५, ४६, ४७, ४८, ३८, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ३६, ३४, ३५, ३०, ३१ व ३२ अशा एकूण  १७ प्लॉटचा कर थकबाकीसह २ लाख २६ हजार ९४२ न भरल्यामुळे १७ मोकळे भूखंड जप्त केले़ २३ जानेवारी रोजी  सांगवी बु़ येथील गट क्रमांक ११७ मधील प्लॉट क्रमांक ८३ हा जप्त करण्यात आला़ ज्याची मालमत्ता कराची थकबाकी ३६ हजार ९८६ रूपये होती़ तसेच ३५ हजार ६०९ रूपये थकबाकी  असणार्‍या मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे़ दरम्यान, एका मालमत्ताधारकांने ६१ हजार ३०७ रूपयांचा थकीत मालमत्ता कराचा धनादेश देऊन कारवाई टाळली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाNandedनांदेड