३८० जणांनी भरला आॅनलाईन कर

By Admin | Updated: July 8, 2014 00:34 IST2014-07-08T00:02:41+5:302014-07-08T00:34:30+5:30

नांदेड : मालमत्ता करात सुधारणा झाल्यानंतर महापालिकेने अग्रीम कर भरल्यास सूट देण्याच्या सुरू केलेल्या योजनेला मालमत्ताधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे़

380 people filled up online by themselves | ३८० जणांनी भरला आॅनलाईन कर

३८० जणांनी भरला आॅनलाईन कर

नांदेड : मालमत्ता करात सुधारणा झाल्यानंतर महापालिकेने अग्रीम कर भरल्यास सूट देण्याच्या सुरू केलेल्या योजनेला मालमत्ताधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ५ ते ३० जून या कालावधीत ३८० मालमत्ताधारकांनी आपल्याकडील ४२ लाख रूपयांचा मालमत्ता कर आॅनलाईन प्रणालीद्वारे भरून २ टक्के जादा सूट मिळवली आहे़
१ एप्रिल २०१४ पासून २०१४- १५ चा अग्रिम मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना विशेष योजना जाहीर करून मालमत्ता करात सूट देण्यात आली आहे़ त्यानुसार ३० जून २०१४ पर्यंत बिल कलेक्टर किंवा क्षेत्रिय कार्यालयात कराचा भरणा केल्यास ८ टक्के आणि आॅनलाईन प्रणालीद्वारे भरल्यास २ टक्के जादा या प्रमाणे मालमत्ता करात एकूण १० टक्के सूट देण्यात आली़ आॅनलाईन प्रणालीद्वारे करभरणा झाल्यास मनपाच्या बिल कलेक्टरकडून मालमत्ताधारकांशी संपर्कासाठी लागणार वेळ, मागणी बिल आणि पावतीसाठी लागणाऱ्या कागदाचा खर्च वाचून मनुष्यबळावरील खर्चातही कपात करणे शक्य असल्याने महापालिकेने आॅनलाईन भरणा करणाऱ्यांना जादा सूट देण्याचे धोरण राबवले आहे़ ही योजना जाहीर झाल्यापासून ३८० जणांनी आपल्याकडील ४१ लाख ६३ हजार ५९५ रूपयांचा मालमत्ता कर आॅनलाईन भरला़ यात शेवटच्या आठवड्यात २४ ते ३० जून या कालावधीत सर्वाधिक २४६ धारकांनी आपला ३४ लाख ३८ हजार २७ रूपयांच्या कराचा भरणा आॅनलाईन केला आहे़ महापालिकेने प्रथमच राबवलेल्या या प्रणालीची माहिती होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात एकाच वेळी एकदिवसीय शिबिर घेतले होते़
१ जुलै ते ३० सप्टेंबर या दरम्यान आॅनलाईन कर भरणाऱ्यास ७ आणि रोखीने भरणाऱ्यास ५ टक्के याप्रमाणे सूट दिली जाणार आहे़ १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान कराचा भरणा केल्यास आॅनलाईनधारकांना ५ टक्के आणि रोखीने भरणाऱ्यास ३ टक्के सूट मिळणार आहे़ जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान कर भरणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही़ आॅनलाईन स्वरूपात कराचा भरणा करण्यास असमर्थ असणाऱ्यांनी आपल्या बिल कलेक्टर किंवा क्षेत्रिय कार्यालयात संपर्क करून रोख स्वरूपात कराचा भरणा करून ३० सप्टेंबर पर्यंत ५ टक्के सूट प्राप्त करून घ्यावी़ ज्यांनी मालमत्ता कर भरला नाही, अशांनी रोख किंवा आॅनलाईन कर भरण्याच्या सूट योजनेचा लाभ घेवून शहराच्या विकासकामात स्वत:चा सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर अब्दुल सत्तार, स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे, आयुक्त जी़ श्रीकांत यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 380 people filled up online by themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.