नांदेडमध्ये ३७ महिला पोलिसांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:32 IST2018-12-06T00:32:11+5:302018-12-06T00:32:48+5:30
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या आवडीनुसार विनंतीबदल्या केल्या आहेत़ काही दिवसांपूर्वीच शंभरावर पोलीस कर्मचा-यांचा त्याचा लाभ मिळाला होता़

नांदेडमध्ये ३७ महिला पोलिसांच्या बदल्या
नांदेड : पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या आवडीनुसार विनंतीबदल्या केल्या आहेत़ काही दिवसांपूर्वीच शंभरावर पोलीस कर्मचा-यांचा त्याचा लाभ मिळाला होता़ आता ३८ महिला पोलिसांच्या विनंतीवरुन बदल्या करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे़
जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पदभार सांभाळताच पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल केले़ त्यामध्ये अनेक पोलीस कर्मचा-यांच्या बदल्याही करण्यात आल्या़ परंतु, पोलीस कर्मचा-यांच्या बदल्या करताना त्यांना अडचण होणार नाही, याची विशेष खबरदारी पोलीस अधीक्षकांना घेतली़ त्यामुळे कर्मचा-यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे़ काही दिवसांपूर्वीच शंभरावर कर्मचा-यांच्या विनंतीवरुन बदल्या करण्यात आल्या होत्या़
त्यात आता ३७ महिला पोलीस कर्मचा-यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या़ त्यामध्ये लोपमुद्रा आणेराव, क्रांती बंदखडके, देऊबाई कॅटमवाड, रुपाली ढोणे, सुवर्णा निकम, अमिरी बेगम, वंदना बुरलेवार, जयश्री शिंदे, ज्योती आंबटवाड, सविता रणखांब, अलका वैद्य, संगीता कोडगिरे, मंगल भोसले, सरोजिनी जाधव, मोहिनी लाटकर, आरती कांबळे, रागिनी सूर्यवंशी, संगीता श्रीमंगले, अश्विनी मस्के, सुनीता सुरेकर, मनीषा गजभारे, शिवरुपा मठपती, सविता शिंदे, सपना सूर्यवंशी, दीपमाला कांबळे, ज्योती मरकंठेवार, कांचन कसबे, पंचफुला फुलारी, बबिता तारु, सीमा जोंधळे, अंजना शिंदे, शांता मलभंगे, रंगाबाई मेंडके, सुकेशनी कांबळे, कावेरी बारोळे, जयश्री शिंदे, वर्षा कदम यांच्यासह सपोउपनि रेणुका विडेकर यांच्या बदल्या करण्यात आल्या़ त्यांना तात्काळ बदली केलेल्या जागी रुजू होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत़ या निर्णयामुळे कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़