जिल्हा परिषदेच्या ३४६ शाळा समायोजनाच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:26 IST2021-02-23T04:26:56+5:302021-02-23T04:26:56+5:30

चौकट- कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे सामाजिककरण होत नाही. त्यामुळे मग अशा शाळेतील विद्यार्थ्यांना लगतच्या शाळेत समायोजित करून त्याचे ...

346 schools of Zilla Parishad on the way of adjustment | जिल्हा परिषदेच्या ३४६ शाळा समायोजनाच्या मार्गावर

जिल्हा परिषदेच्या ३४६ शाळा समायोजनाच्या मार्गावर

चौकट- कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे सामाजिककरण होत नाही. त्यामुळे मग अशा शाळेतील विद्यार्थ्यांना लगतच्या शाळेत समायोजित करून त्याचे सामाजिककरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र असे करताना कोणतीही शाळा बंद करण्याचे शासनाचे निर्देश नाहीत. विद्यार्थ्यांचे मोठ्या शाळेत समायोजन करण्यासाठी पालकांना समजून सांगणे गरजेचे आहे. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, जि.प. नांदेड.

चौकट- शिक्षकांचे काय- जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकांचे समायोजन लगतच्या शाळेत करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र जोपर्यंत ती शाळा सुरू आहे, तोपर्यंत संबंधित शिक्षक त्याच शाळेत राहतील. गतवर्षी ४४ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे समायोजन करण्यात आले होते.

चौकट- विद्यार्थ्यांचे काय- कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे सामाजिककरण होत नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे जवळच्या जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पालकांना समजावून सांगणे महत्त्वाचे ठरते. पालकांच्या संमतीने अशा विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येईल.

चौकट- या शाळांचे हाेणार समायोजन

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३४६ शाळेतील विद्यार्थी पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. अशा शाळेतील विद्यार्थ्यांचे सामाजिककरण करण्याच्या दृष्टीने दुसऱ्या शाळेत समायोजन करणे आवश्यक आहे. अर्धापूर येथे ४, भोकर १३, बिलोली ६, देगलूर २०, धर्माबाद ४, हदगाव ३२, हिमायतनगर १८, कंधार ३३, किनवट ७४, लोहा ३७, माहूर २४, मुदखेड ३, मुखेड ४६, नायगाव १२, नांदेड ग्रामीण १०, नांदेड शहर ३, उमरी ७ शाळेतील पटसंख्या २० पेक्षा कमी आहे.

Web Title: 346 schools of Zilla Parishad on the way of adjustment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.