शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

अर्जापूर व धर्माबाद येथीलपानसरे स्मारक सुधारणेसाठी ३४ वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:28 IST

हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या अर्जापूर व धर्माबाद येथील स्मारकांसाठी राज्य शासनाने प्रत्येकी दहा-दहा लाख रुपयांचे अनुदान दिले.

ठळक मुद्देस्मारकांसाठी प्रत्येकी दहा-दहा लाख रुपये मंजूर, १५ दिवसांत अर्जापूरचे काम होणार सुरु

राजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या अर्जापूर व धर्माबाद येथील स्मारकांसाठी राज्य शासनाने प्रत्येकी दहा-दहा लाख रुपयांचे अनुदान दिले. आता स्मारकांची मोठी सुधारणा होणार आहे़ दरम्यान, धर्माबाद येथील काम सुरू झाले असून येत्या १५ दिवसांत अर्जापूर येथील स्मारकाच्या कामास प्रारंभ होणार, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाली आहे़सहा महिन्यांपूर्वी राज्य शासनाने १९८४ निर्मित सर्व स्मारकांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार प्रत्येक स्मारकासाठी दहा लाखांचे अनुदान मंजूर करण्यात आले़स्मारकांची पुनर्बांधणी, रंगरंगोटी व गरजेनुसार सर्व कामांचे बांधकाम, साहित्य आदींचे प्रावधान ठेवण्यात आले़ मार्चपूर्व सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पर्धात्मक ई-निविदा मागवल्या़ त्यानुसार संबंधित ठेकेदारांना ही कामे सोपविण्यात आली आहेत़दोन्ही स्मारकांचा आता सुशोभीकरण व कायापालट केला जाणार आहे़ धर्माबाद येथील स्मारकाचे काम सुरू झाले तर येत्या पंधरवड्यात अर्जापूर येथील बांधकाम सुरू करण्यात येणार आहे़ हुतात्मा गोविंदराव पानसरे हे मराठवाडा मुक्तिसंग्रामातील पहिले हुतात्मा आहेत़ निजाम राजवटीत रझाकारांच्या जुलमी अत्याचारात त्यांचा बिलोली न्यायालयातून परत धर्माबादकडे जात असताना अर्जापूर स्थित शिवारात हत्या झाली होती़स्मारके झाली जीर्णरंगरंगोटीअभावी ही स्मारके जीर्ण अवस्थेत असल्याची स्थिती निर्माण झाली़ स्मारकासाठी दरवर्षी कोणतेही अनुदान नसल्यामुळे मागच्या ३४ वर्षांत या वास्तू अडगळीला पडल्या़ स्मारक सुधारणा व्हावी अशी चर्चा केवळ स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणप्रसंगीच होत असे़ पण ठोस असा पाठपुरावा कधीच झाला नाही़ परिणामी स्मारकांचे दुर्लक्ष झाले व अडगळीला पडू लागली़स्मारकांची दयनीय अवस्थासन १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅ़स्व़ए़आऱ अंतुले यांनी हुतात्म्यांच्याप्रीत्यर्थ त्यांच्या मूळ गावी हुतात्मा स्मारक उभारण्याची संकल्पना पूर्ण केली़ संयुक्त बिलोली तालुक्यातील धर्माबाद व अर्जापूर येथे गोविंदराव पानसरे यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यात आले, अशा स्मारक सभागृहात प्रारंभी वाचनालय व महत्त्वपूर्ण बैठक आदींचे आयोजन करण्यात येत असे़ अर्जापूर येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात तर धर्माबाद येथे शास्त्री महाविद्यालयाच्या मार्गावर स्मारके बांधण्यात आली़ कालांतराने स्मारकांची देखभाल नसल्याने दरवाजे, खिडक्या, छत, फरशी आदींची दयनीय अवस्था झाली़हुग़ोविंदराव पानसरेंची समाधीदेखील अर्जापूरला आहे़ स्मारकापाठोपाठ समाधीजवळ देखील काही सुधारणा करणे आवश्यक आहे़ यापुढे स्मारकाच्या देखरेखीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, कामाची दर्जा चांगला असावा ही अपेक्षा आहे.-सतीश जोशी, अध्यक्ष, जनकल्याण सेवाभावी संस्था, अर्जापूऱ

टॅग्स :NandedनांदेडfundsनिधीGovind Pansareगोविंद पानसरे