शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

टाळे लागलेल्या आयुर्वेद व युनानी रसशाळेसाठी ३० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 1:01 AM

राज्यात एकमेव असलेल्या नांदेडातील शासकीय आयुर्वेद आणि युनानी रसशाळेतील औषधीनिर्मिती गेल्या पाच वर्षांपासून ठप्प आहे़ एकेकाळी देशभरात दबदबा असलेल्या या रसशाळेला अखेरची घरघर लागली आहे़ असे असताना रसशाळेच्या सक्षमीकरणासाठी निधी देण्याऐवजी शासनाने टाळे लागलेल्या या इमारतीच्या रंगरंगोटी आणि देखभालीसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे़

ठळक मुद्देउत्पादन ठप्प असताना रंगरंगोटी आणि दुरुस्तीवर होणार खर्च

नांदेड : राज्यात एकमेव असलेल्या नांदेडातील शासकीय आयुर्वेद आणि युनानी रसशाळेतील औषधीनिर्मिती गेल्या पाच वर्षांपासून ठप्प आहे़ एकेकाळी देशभरात दबदबा असलेल्या या रसशाळेला अखेरची घरघर लागली आहे़ असे असताना रसशाळेच्या सक्षमीकरणासाठी निधी देण्याऐवजी शासनाने टाळे लागलेल्या या इमारतीच्या रंगरंगोटी आणि देखभालीसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे़ त्यामुळे रसशाळेचे रुपडे पालटणार असले तरी, प्रत्यक्षात औषधी निर्मितीच नसल्यामुळे त्याचा काहीच उपयोग होणार नाही हेही तेवढेच खरे़आयुर्वेद व युनानी रसशाळेला मोठा इतिहास आहे़ निजाम काळापासून ही रसशाळा अस्तित्वात असून देशभरात तिचा दबदबा होता़ या रसशाळेतून एकेकाळी देशभरात औषधी पुरवठा केला जात होता़ परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे या रसशाळेला नजर लागली़ गेल्या पाच वर्षांपासून शासनाने कच्चा माल खरेदीचे दरपत्रकच निश्चित केले नाही़ त्यामुळे औषधी उत्पादन ठप्प झाले़ रसशाळेतील तब्बल ४० लाखांहून अधिकची औषधी अनेक वर्षे तशीच पडून होती़रसशाळेतील ११० कर्मचाऱ्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना इतर विभागात हलविण्यात आले़ रसशाळेच्या भरभराटीच्या काळात औषधी वनस्पतींचा पुरवठ्यासाठी बारड परिसरात ४० हेक्टर जमीन घेण्यात आली होती़ या जमिनीवर १९८ प्रकारच्या विविध औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींची लागवड करण्यात आली होती़ परंतु आता रसशाळाच बंद पडल्यामुळे हे औषधी वनस्पती उद्यानही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ दुसरीकडे रसशाळेतील कोट्यवधी रुपयांची यंत्रेही धूळखात पडून आहेत़ तर काही यंत्रांचे पॅकींगही उघडण्यात आले नाही़ शासनाकडे रसशाळेसाठी अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला़ परंतु त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेल्याने नांदेडातील ही रसशाळा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ असे असताना शासनाने मात्र रसशाळेच्या कच्चा माल खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन रसशाळेला ‘अच्छे दिन’ आणण्याऐवजी इमारतीची रंगरंगोटी आणि दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला आहे़ प्रत्यक्षात उत्पादन बंद असल्यामुळे ही इमारत बंदच आहे़ यातील प्रयोगशाळेतील तज्ज्ञ सेवानिवृत्त झाल्यानंतर या ठिकाणी प्रयोगशाळाही नावालाच आहे़ असे असताना ३० लाखांच्या निधीची मंजुरी म्हणजे ‘आजार म्हशीला अन् इंजेक्शन पखालीला’ असाच काहीसा प्रकार असल्याचे दिसून येते़नियोजनबद्ध रितीने रसशाळेतील उत्पादन पाडले बंद

  • नांदेडातील या रसशाळेत अनेक महत्त्वाची औषधी तयार केली जात होती़ ही औषधी जिल्हा परिषदेच्या रुग्णालयांमध्ये पाठविली जात होती़ तशी दरवर्षी मागणीही नोंदविण्यात येत होती़ परंतु, मध्यंतरी शासनाने रसशाळेकडून औषधी खरेदी न करता ती बाहेरुन घेण्यास सुरुवात केली होती़ त्यामुळे रसशाळा तोट्यात आली़ त्यात दरवर्षी कच्चा माल खरेदीसाठी शासनाकडून दरपत्रकच निश्चित करण्यात येत असल्यामुळे रसशाळेतील उत्पादन ठप्प झाले़
  • नांदेडातील ही रसशाळा टिकली पाहिजे यासाठी आतापर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावर प्रयत्नच केले नसल्याचे दिसून आले आहे़ रसशाळेच्या असलेल्या मोक्याच्या जागेवरच अनेकांचा डोळा आहे़ त्यामुळे रसशाळेच्या अधोगतीकडे दुर्लक्षच करण्यात आले़

 

टॅग्स :NandedनांदेडAyurvedic Home Remediesघरगुती उपायfundsनिधी