शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ९ नोव्हेंबरची डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 06:27 IST

या याचिकेच्या अनुषंगाने गृहविभागाने दाखल केलेल्या शपथपत्रात रिक्त पदांची स्थिती उघड केली.

राजेश निस्ताने नांदेड : महाराष्ट्र पाेलीस दलात कर्मचारीच नव्हे, तर अधिकाऱ्यांचीही वानवा आहे. आजघडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून तब्बल २९ हजार ४०१ पदे रिक्त आहेत. राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव अनिल कुलकर्णी यांनी ५ जुलै २०२२ राेजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रातून रिक्त जागांचे हे ‘वास्तव’ उघड झाले आहे.   

पाेलीस दलातील कामकाज सुधारावे, या अनुषंगाने काेपरगाव (जि. अहमदनगर) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्कर काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका  दाखल केली हाेती. काेराेना संकटामुळे या याचिकेवरील सुनावणी दाेन वर्षे लांबली. आता २५ जुलै २०२२ राेजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. एम. एस. कर्णिक यांनी त्यावर सुनावणी करताना पाेलीस दलातील रिक्त जागांबाबत ९ नाेव्हेंबरला शासनाला शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या तारखेपर्यंत किती जागा भरल्या व उर्वरित जागा केव्हा भरणार, याची माहिती शपथपत्राद्वारे मागण्यात आली आहे. 

या याचिकेच्या अनुषंगाने गृहविभागाने दाखल केलेल्या शपथपत्रात रिक्त पदांची स्थिती उघड केली. राज्य पाेलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकूण ४३ वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्यासाठी एकूण दोन लाख १९ हजार ७७६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २९ हजार ४०१ पदे रिक्त आहेत. राज्यात एक लाख लाेकसंख्येमागे १९८ पाेलीस उपलब्ध हाेणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात १७४ पाेलीस उपलब्ध हाेत आहेत.  वेळेत पदाेन्नती दिली जात नसल्यानेही रिक्त पदे वाढत आहेत. काेराेनापूर्वी पाेलीस दलात पाच टक्के पदे रिक्त हाेती. काेराेनानंतर ही टक्केवारी १३ वर पाेहाेचली आहे.    

काय आहेत याचिकेतील मुद्दे?

पाेलिसांची संख्या वाढवा, आठ तास ड्यूटी, रिक्त पदे भरा, वाहने अद्ययावत द्या, यंत्रणा सक्षम करा, तपासासाठी स्वतंत्र पाेलीस यंत्रणा असावी, सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात करावी, पाेलीस ठाण्यात सीसीटीव्ही असावे, शस्त्रे अद्ययावत असावीत, पाेलिसांकडे इलेक्ट्रिक गन (केवळ शाॅक देऊन बेशुद्ध करणारी बुलेट) असावी, पाेलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध याेजना असाव्यात, आदी मागण्यांकडे या याचिकेतून लक्ष वेधले आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार