रस्त्यासाठी २९ लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST2021-04-27T04:18:20+5:302021-04-27T04:18:20+5:30

हनुमान जयंती घरीच साजरी करा नांदेड - उद्या २७ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. यानिमित्ताने हनुमान टेकडी येथे मंगळवारी ...

29 lakh sanctioned for roads | रस्त्यासाठी २९ लाख मंजूर

रस्त्यासाठी २९ लाख मंजूर

हनुमान जयंती घरीच साजरी करा

नांदेड - उद्या २७ एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. यानिमित्ताने हनुमान टेकडी येथे मंगळवारी पहाटे ४ वाजता महारुद्राभिषेक, सकाळी १०.१५ वाजता आरती आणि ७ वाजता शृंगार आरती होणार आहे, अशी माहिती पुजारी गजानन जगन्नाथ यांनी दिली. हनुमान जयंतीचे बाकी कार्यक्रम रद्द करण्यात आले. भाविकांनी मंदिरात येऊ नये, घरी बसून हनुमान जयंती साजरी करावी. हनुमान चालिसाचा पाठ करावा, असे आवाहन गजानन शर्मा यांनी केले आहे.

वंचिततर्फे मोफत सॅनिटाझेशन

नांदेड - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभाग क्र.१९व २० मध्ये मोफत सॅनिटायझेशन मोहीम राबवण्यात आली. राज्य प्रवक्ते फारुख अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली महानगराध्यक्ष अयुब खान, विठ्ठल गायकवाड यांनी ही मोहीम राबवली. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

भाजपातर्फे जेवणाचे डब्बे

मुदखेड - येथील भाजपा कार्यकर्त्यांच्याव तीने कोविड सेंटर येथे रुग्णांना रविवारी जेवणाचे डब्बे देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक महेश शर्मा, फौजदार सुरेश भाले, माजी नगरसेवक कैलास गोडसे, महिला आघाडीच्या जया देशमुख, तालुकाध्यक्ष शंकर मुतपलवाड, शहराध्यक्ष मुन्ना चांडक, दिलीप देशमुख, अशोक पाटील, अप्पाराव पाटील, कालिदास जंगीलवाड, सोमेश मांडगुळकर आदी उपस्थित होते.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटी

किनवट - शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आणि माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोड यांनी माहूर व किनवट तालुक्यातील सुमारे १३० शाळा व गावांना भेटी दिल्या. यामध्ये हिंगणी, इवळेश्वर, तांदळा, तांदळा तांडा, पवनाळा, अनंतवाडी, कुपटी, दिगडी, धानोरा, पाचुंदा, वानोळा, मेंडकी, मुंगशी, किनवट तालुक्यातील मोहाडा, दरसांगवी, कोलमपेट, जवरला, नागापूर, पिंपळशेंडा, डोंगरगाव, मोहदा, दहेगाव, हनुमान नगर, पवनाळा, शिऊर, जुनापाणी, जरूरतांडा, सावळी, टेंभी, वझरा या गावांचा समावेश आहे.

धर्माबादेत घाणीचे साम्राज्य

धर्माबाद - शहरातील विविध भागात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. नगर परिषद प्रशासन व सत्ताधारी नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मुख्याधिकारी पदाचा पदभार तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांच्याकडे आहे, तरीही कारभार सुधारला नाही. शहरातील आनंदनगर, इंदिरानगर, गुलमोहर कॉलनी, शंकरगंज, रसिकनगर, शिवाजीनगर, गांधीनगर, गणेशनगर, पटेलनगर, देवीगल्ली, रामगल्ली, सरस्वती नगर शिक्षक कॉलनी, विद्यानगर, रत्नाळी, बाळापूर येथील नाल्या तुडुंब भरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

कोविड चाचणी सुरू

नांदेड - सिडको येथील मनपाच्या मातृसेवा आरोग्य रुग्णालयात गेल्या पाच-सहा दिवसांपासून कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले. यामुळे या भागातील नागरिकांची चांगलीच सोय झाली आहे. दररोज जवळपास ८० ते १०० लोकांची तपासणी केली जात असल्याची माहिती आरोग्य कर्मचारी सुरेश अरगुलवार यांनी दिली. तपासणी कक्षात मोहिनी वाघमारे, संदीप तुपेकर, विवेकानंद लोखंडे, ज्योती सूरनर, वैशाली वाघमारे आदी मदत करत आहेत.

शेतकऱ्यांना सहकार्य करा

धर्माबाद - कोरोनामुळे सध्या ब्रेक द चेन चालू आहे. या काळात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर यांनी केले. सकाळी ७ ते ११ या वेळेतच माल मार्केट यार्डात आणता येईल, असे बंधन आहे. २०-२५ टक्के शेतकऱ्यांकडे अद्यापही सोयाबीन पडून आहे. शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा आहे. आता खरिपाच्या मशागतीची तयारी पूर्ण झाली असून पेरणीची तयारीही सुरू आहे. अशातच लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे शेतकरी भरडला जात आहे, असेही करखेलीकर म्हणाले.

तहसीलदारांनी दिल्या भेटी

धर्माबाद -येथील तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन आढावा घेतला. यादरम्यान रस्त्याने मुक्त संचार करणाऱ्यांची जागेवरच ॲन्टिजन तपासणी करण्यात आली. तालुक्यात आतापर्यंत शहरी भागात ४६६ तर ग्रामीण भागात ४६० रुग्णसंख्या झाली. त्यापैकी ६५८ जणांनी कोरोनावर मात केली. १३३ जणांवर उपचार सुरू आहेत. उर्वरितपैकी सौम्य लक्षणे असलेल्यांचे गृह विलगीकरण करण्यात आले. गंभीर रुग्ण रेफर करण्यात आले. दीड महिन्यात ९ जणांचा मृत्यू झाला.

Web Title: 29 lakh sanctioned for roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.