जिल्ह्यात २६५ बालकांना आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST2021-06-06T04:14:33+5:302021-06-06T04:14:33+5:30

एका बालकाचे दगावले आई-वडील जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनेे अनाथ झालेल्या बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत एक ...

265 children in the district need support | जिल्ह्यात २६५ बालकांना आधाराची गरज

जिल्ह्यात २६५ बालकांना आधाराची गरज

एका बालकाचे दगावले आई-वडील

जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनेे अनाथ झालेल्या बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे. आतापर्यंत एक पालक गमावलेल्या मुलांची संख्या २६५ झाली आहे, तर आई-वडील गमावलेल्या एका मुलाची माहिती प्राप्त झाली आहे. अजूनही महिला बालकल्याण विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे ही संख्या अंतिम नाही. अनाथ बालकांच्या मदतीसाठी शासन उपाययोजना करीत आहे.

चौकट - कोरोनाने स्वप्नच हिरावले

कोरोना संकटात घराचा आधारस्तंभ कोसळला. भविष्याची स्वप्ने रंगवत असताना अचानक कोरोनामुळे वडील गेले आणि भविष्य अंधकारमय झाले. आई असली तरी ती आतापर्यंत कधी घराबाहेर पडली नव्हती. घरातील इतर सदस्यही लहान आहेत. त्यामुळे करायचे काय, असा प्रश्न आहे.

आता जगणेही अवघड

कोरोनाच्या पहिल्या लाटेत घरात अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. दुसऱ्या लाटेत तर आभाळच कोसळले. आता कुठे सुरळीत होत असतानाच वडील पॉझिटिव्ह आले अन् सर्वच काही संपले. आता जगणेही अवघड झाले आहे.

मदतीपेक्षा दु:ख पचवणे अवघड

घरातील आधार असलेले वडील १० दिवसांत आपल्यातून गेल्याने दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. वडिलांच्या आधाराने एक एक पाऊल टाकत असताना तो आधारच कोसळला. हे दु:ख पचवणे जड जात आहे. मदतीपेक्षा वडिलांचे असणे हाच मोठा आधार होता.

Web Title: 265 children in the district need support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.