शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:39 IST

उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्नदेखील उद्भवत आहेत़ जिल्ह्यात जवळपास दहा टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जिल्ह्यातील १०६ प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ २५़८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ विष्णुपुरीत केवळ ८़८३ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे ग्रामीण भागासह नांदेड शहरालादेखील यंदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़

ठळक मुद्देविष्णूपुरीत केवळ ८.८ दलघमी पाणी: १०६ पैकी ४२ प्रकल्पांनी गाठला तळ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्नदेखील उद्भवत आहेत़ जिल्ह्यात जवळपास दहा टँकरने पाणीपुरवठा सुरू असून जिल्ह्यातील १०६ प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ २५़८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ विष्णुपुरीत केवळ ८़८३ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे ग्रामीण भागासह नांदेड शहरालादेखील यंदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे़जिल्ह्यात असलेल्या मानार आणि विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ११़१३ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ तर ९ मध्यम प्रकल्पाची स्थितीही पन्नास टक्क्याहून खालीच आहे़ जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात ४८ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे़ यामध्ये मुखेड तालुक्यातील कुंदराळा प्रकल्पात ३़६९ टक्के, देगलूर-करडखेड प्रकल्पात ६४़१८ टक्के, उमरी-कुदळा-४३़२८ टक्के, कंधार तालुक्यातील महालिंगी प्रकल्प कोरडाठाक पडला असून पेठवडज प्रकल्पात केवळ १२़१६ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ तर लोह्यातील उर्ध्व मानारमध्ये ३८़३६ टक्के पाणीसाठा आहे़ किनवट तालुक्यातील नागझरी मध्यम प्रकल्पात ४३़०३ टक्के, लोणी-१३़३१ तर डोंगरगाव प्रकल्पात ५६़५५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़ परंतु, दिवसेंदिव वाढणाºया तीव्रतेमुळे बाष्पीभवन होवून पाणीसाठ्यात घट होत आहे़जिल्ह्यातील लघु प्रकल्पांनीही तळ गाठला असून १६़८९ टक्के पाणी उपलब्ध आहे़ एकूण ८८ लघुप्रकल्पापैकी केवळ ५ प्रकल्पामध्ये ५० टक्क्याहून अधिक पाणी उपलब्ध आहे़ यात देगलूर तालुक्यातील येडूर, बिलोली तालुक्यातील दर्यापूर, तळणी, किनवटमधील थोरा आणि सदिगी प्रकल्पाचा समावेश आहे़ इतर प्रकल्पाच्या तुलनेत उच्च पातळी बंधारे आणि कोल्हापूरी बंधाºयामध्ये उपयुक्त जलसाठा अधिक आहे़जिल्ह्यातील प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा पाहता यंदा ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा अधिक प्रमाणात बसणार असल्याचे दिसते़ मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात १० टँकर सुरू करावे लागले आहे़ जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी नियोजन करण्यात आले असून नजीकच्या जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीसाठा आरक्षित केला आहे़उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्षेत्रात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने इसापूर यंदा भरले नाही़ प्रकल्प उभारल्यापासूनची ही अशी पहिलीच वेळ आहे़ केवळ १६ टक्के भरलेल्या इसापूरमध्ये आज केवळ साडेतीन टक्के पाणीसाठा आहे़ त्यातून सिंचनासाठी यापुर्वी १ रोटेशन देण्यात आले आहे़ हा प्रकल्प उमरखेड नगरपालिका आणि अर्धापूर, मुदखेड तालुक्यातील जनतेची तहान भागविण्याचे काम करते़ या प्रकल्पात उपलब्ध असलेल्या जलसाठ्यापैकी ४७ टक्के पाणी नांदेड जिल्ह्यासाठी आरक्षित केले आहे़ तर हिंगोलीसाठी ५ टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी ३२ टक्के पाणीसाठा आरक्षीत केला आहे़इसापूर धरणील जलसाठ्याअभावी नांदेड शहरासाठीची आसना नदीवरील पर्यायी पाणीपुरवठा योजनाही यावर्षी बंदच राहणार आहे़ मागील दोन वर्षात निर्माण झालेल्या पाणीटंचाई काळात इसापूर प्रकल्पातील पाण्यामुळे नांदेडकरांची तहान भागली होती़दिग्रस, जायकवाडीतून पाणी सोडण्याची गरजनांदेड जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, कालवा समिती आणि जलसंपदा मंत्र्याच्या उपस्थित झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार नांदेडसाठी पूर्णा, डिग्रस आणि जायकवाडी प्रकल्पात पाणीसाठा आरक्षित केला आहे़ गरजेनुसार या प्रकल्पातून नांदेडसाठी पाणी उपलब्ध होऊ शकते़ विष्णूपुरी प्रकल्पातील आजघडीला केवळ दहा टक्के पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळे पुढील काही दिवसातच विष्णूपुरीमध्ये डिग्रस प्रकल्पातून पाणी सोडावे लागणार आहे़ गावपातळीवरील अनेक योजना बंद ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाºया अनेक नळयोजना थकीत वीजबिलापोटी बंद आहेत़ यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने राबविलेल्या योजना अधिक आहेत़ काही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करूनदेखील बंद असल्याने लाखो रूपयांच्या योजना शोभेच्या वास्तू बनल्या आहेत़ दरम्यान, नांदेड पाटबंधारे विभागाचे महापालिका आणि जिल्हा परिषदेकडे कोट्यवधी रूपये थकले आहेत़ त्यामुळे येणाºया काळात थकीत बिलावरून जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नांदेड पाटबंधारे विभाग आमने सामने येऊ शकतो़ पाण्याच्या दराचा विषयावरून मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकीत आहे़ दराचा प्रश्न मार्गी लागल्यास हा विषय मार्गी लागू शकतो़