शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात फौजदारांच्या २३६० जागा रिक्त; सहायक उपनिरीक्षक, पोलीस अंमलदारांना बढतीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 12:18 IST

पोलीस अंमलदारांना बढती देऊन पोलीस उपनिरीक्षक बनविले जाणार आहे.

नांदेड : राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या तब्बल २ हजार ३६० जागा रिक्त असून, त्यात सर्वाधिक मुंबईचा समावेश असलेल्या कोकण विभाग-२ मध्ये आहेत. दरम्यान, यातील रिक्त जागा भरण्यासाठी सहायक उपनिरीक्षक तथा पोलीस हवालदारांना बढती दिली जाणार आहे.

राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी ७ मार्चरोजी फौजदारांच्या रिक्त जागांची स्थिती जाहीर केली. त्यानुसार, एकूण ७ महसूल विभागात २३६० जागा रिक्त आहेत. कोकण-२ मध्ये १६२२, नागपूर-२५६, नाशिक व पुणे प्रत्येकी १४७, अमरावती १०२, कोकण १-८०, तर औरंगाबाद विभागात ४९ जागा रिक्त आहेत. फौजदारांच्या यातील जागा पदोन्नतीने भरल्या जाणार आहेत. पोलीस अंमलदारांना बढती देऊन पोलीस उपनिरीक्षक बनविले जाणार आहे. त्याअनुषंगाने पदोन्नतीच्या यादीतील अंमलदारांचा महसुलीत पसंतीक्रम मागण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून बढतीची प्रतीक्षाराज्य पोलीस दलातील अंमलदारांना अनेक वर्षांपासून फौजदार पदावरील बढतीची प्रतीक्षा होती. अखेर शासनाने १४ जुलै २०२१ रोजी त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे फौजदार होण्याचे अंमलदारांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत कित्येक अंमलदार सेवानिवृत्त झाले आहेत. पदोन्नतीची ही यादी लवकर न निघाल्यास आणखी काही अंमलदार सेवानिवृत्त होण्याची व त्यांचे फौजदार होण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद