१८ हजार बांधकाम मजूरांना मिळणार दीड हजार रूपये, नोंदणी न केलेल्यांचे काय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:17 IST2021-04-15T04:17:06+5:302021-04-15T04:17:06+5:30
बांधकामासह इतर कोणतेही मिळेल ते काम करतो. परंतु, शिक्षण नसल्याने आम्हाला नोंदणी करण्याची माहिती नाही. गेल्यावेळी दोन हजार रूपये ...

१८ हजार बांधकाम मजूरांना मिळणार दीड हजार रूपये, नोंदणी न केलेल्यांचे काय
बांधकामासह इतर कोणतेही मिळेल ते काम करतो. परंतु, शिक्षण नसल्याने आम्हाला नोंदणी करण्याची माहिती नाही. गेल्यावेळी दोन हजार रूपये अनेकांना मिळाले म्हणून यावेळी नोंदणी केली. परंतु, त्यातही काहीतरी ऑनलाईन करायचे राहिले म्हणून आमचे नाव आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. - रामेश्वर लिंगायत, मजूर
मागील चार वर्षापासून नांदेडमध्ये बांधकामावर काम करतो. कधी मिस्त्रीच्या हाताखाली तर कधी स्वतच बांधकाम करतो. परंतु, आजपर्यंत शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. शहरात आल्यापासून धान्यही मिळत नाही. येथील रेशनकार्ड मिळालेले नाही. आता शासन अनुदान देत आहे. तेही आम्हाला मिळणार नाही. - बालाजी यमडवार, मजूर
बांधकाम करता करता आयुष्य गेले. परंतु, आम्हाला शासनाकडून काहीतरी मिळते हे माहितीदेखील नाही. एकवेळ आम्ही नोंदणीसाठी हजार रूपये दिले होते. तो एजंट कुठे गेला की पत्ताच नाही. तेव्हापासून कुठेही नोंदणी केली नाही. आमच्या सोबत असलेल्या अनेकांना दोन हजार रूपये मिळाले आणि आता दिड हजार मिळणार आहेत. परंतु, आम्हाला छदामही नाही. - अशोक जाधव, मजूर.