किनवट तालुक्यातील १७ पशूधन दवाखाने आयएसओ’साठी मानांकित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 10:55 IST2018-01-05T00:58:10+5:302018-01-05T10:55:07+5:30
तालुक्यातील २८ पैैकी १७ पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले. ५ दवाखान्यांना यापूर्वीच आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.एन. आडकोड यांनी दिली.

किनवट तालुक्यातील १७ पशूधन दवाखाने आयएसओ’साठी मानांकित
किनवट : तालुक्यातील २८ पैैकी १७ पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ मानांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले. ५ दवाखान्यांना यापूर्वीच आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.एन. आडकोड यांनी दिली.
पंचायत समितीच्या अंतर्गत येणाºया २८ पशुधन संस्थांमार्फत जनावरांच्या आरोग्याची देखभाल केली जाते. ती दवाखाने आयएसओ होण्यासाठी लोकवर्गणीतून निधी गोळा करण्यात आला. सद्य:स्थितीत जलधारा, परोटीतांडा, इस्लापूर, कुपटी व अप्पाराव पेठ या दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील पाच गावे दत्तक घेतल आहेत. यापैैकी प्रधान सांगवी, दिगडी व गौरी येथे पशु रोग निदान व उपचार शिबीर घेण्यात आले. धामनदरी, अंबाडीतांडा, वझरा बु., आंदबोरी या गावात लवकरच शिबीर घेण्यात येणार असल्याचे डॉ. आडकोड यांनी सांगितले.