पंचायत विभागाच्या १६० बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:19 IST2021-07-29T04:19:13+5:302021-07-29T04:19:13+5:30

जिल्हा परिषदेत समुपदेशन प्रक्रियेने बदल्या केल्या जात आहेत. २८ जुलै रोजी ग्रामपंचायत विभागांतर्गत विस्तार अधिकारी सांख्यिकी पदाच्या सात ...

160 transfers of Panchayat department | पंचायत विभागाच्या १६० बदल्या

पंचायत विभागाच्या १६० बदल्या

जिल्हा परिषदेत समुपदेशन प्रक्रियेने बदल्या केल्या जात आहेत. २८ जुलै रोजी ग्रामपंचायत विभागांतर्गत विस्तार अधिकारी सांख्यिकी पदाच्या सात बदल्या झाल्या. यात चार प्रशासकीय तर तीन बदल्या विनंती करुन झाल्या. विस्तार अधिकारी पंचायत पदाच्याही सात बदल्या झाल्या. ग्रामविकास अधिकारी संवर्गात १६ बदल्या करण्यात आल्या आहेत. ९ बदल्या प्रशासकीय तर सात विनंती बदल्या आहेत. ग्रामसेवक संवर्गात १३० बदल्या झाल्या आहेत. यामध्ये २९ विनंती बदल्या तर १०१ प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. या बदल्यामध्ये किनवट व माहूर तालुक्यात रिक्त असलेल्या संपूर्ण जागा भरण्यात आल्या आहेत. यावेळी जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे आदींची उपस्थिती होती.

Web Title: 160 transfers of Panchayat department