शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

तामसा यात्रेतील १५० क्विंटल भाजी अन् ५० क्विंटलच्या भाकरीच्या महाप्रसादाला अमृताची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 18:20 IST

मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र बारा ज्योतिर्लिंग यात्रेसाठी बुधवारपासूनच हजारो भाविक तामशात दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देबारालिंगचे शिवालय प्राचीन हेमाडपंती दरवर्षी भाविकांची ही महापंगत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पार पडते़तामसा यात्रेला १०० वर्षाची परंपरा

- सुनील चौरेहदगाव (जि़नांदेड) : हदगाव तालुक्यातील तामसा येथे श्रीक्षेत्र बारा ज्योतिर्लिंग देवस्थानात गुरुवारी झालेल्या भाजी भाकरीच्या महापंगतीत १५० क्विंटल भाजी अन् ५० क्विंटलच्या भाकरीचा स्वाद हजारो भाविकांनी घेतला. भाविकांच्या गर्दीमुळे तामसा परिसर फुलून गेला होता़ तामस्यातील या महापंगतीला १०० हुन अधिक वर्षाची परंपरा आहे़ 

मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच करीदिनी गुरुवारी ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली़ मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या या श्रीक्षेत्र बारा ज्योतिर्लिंग यात्रेसाठी बुधवारपासूनच हजारो भाविक तामशात दाखल झाले होते़ मकरसंक्रांतीला वेगवेगळ्या रंगाची भाजी, फळे यांचे वाण करुन खाण्याची व मित्रांना तीळगुळासह देण्याची प्रथा आहे़ त्याच धर्तीवर ही भाजी-भाकरी पंगत घेण्यात येते़ बारा ज्योतिर्लिंग असलेल्या महादेवाच्या पिंडीला गुरुवारी सकाळी अभिषेक झाल्यानंतर दुपारी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर उपस्थित हजारो भाविकांना प्रसाद वाटपास सुरुवात झाली. 

या महापंगतीसाठी देवस्थानच्या वतीने १५० क्विंटची भाजी करण्यात आली होती. या भाजीच्या तयारीसाठी मागील आठवडाभरापासून  भाज्या निवडणे, स्वच्छ करणे आदी तयारी केली जात होती़ गावापासून जवळ माळरानावर असलेल्या या मंदीरात तामस्यासह परिसरातील महिला-पुरुष एकत्रित येवुन लिंब, चिंचेसह इतर झाडांचा पाला जो मनुष्याच्या अपायकारक नाही़ एकत्रित करतात यामध्ये वाण म्हणून बोर, अवळा, ऊस, केळी, पेरू टाकले जातात. तर इतर भाज्यामध्ये गोबीपत्ता, वांगी, भेंडी, पालक, गवार, मुळगा आदींचा समावेश आहे. यात्रेसाठी नांदेडसह हिंगोली, परभणी, पुणे, यवतमाळ, निजामाबाद आदी ठिकाणाहून भाविक तामस्यामध्ये दाखल झाले होते़ या भाजी भाकरी महापंगतीसाठी बारा ज्योतिर्लिंग समितीचे अध्यक्ष संतोष निलावार, प्रदीप बंडेवार, अनंता भोपले, दिगंबर महाजन, रमेश घंटलवार, विजय लाभशेटवार, रवी बंडेवार, अनंत घंटलवार, दिलीप बास्टेवाड, बालाजी महाजन आदींनी परीश्रम घेतले़  महापंगतीच्यानिमित्ताने तामसा ग्रामस्थांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवुन सहकुटूंब या उपक्रमाचा आनंद घेतला़

बारालिंगचे शिवालय प्राचीन हेमाडपंतीशरीरासाठी आरोग्यशास्त्रनुसार उपयुक्त असलेल्या फळेभाज्या, पालेभाज्या, कंदमुळे यांना खेड्यातील मराठी माणूस अनन्यसाधारण महत्त्व देतो. सर्व प्रकारची जीवनसत्त्वे व प्रथिने असलेला कसदार भाजीपाला येथे भाजीसाठी वापरला जातो. येथील बारालिंगचे शिवालय प्राचीन हेमाडपंती आहे.  मुख्य पिंड ही जमिनीपासून भूगर्भात अंदाजे दहा फूट खोल आहे. मंदिरात  उजव्या बाजूला बारा पिंडी आहेत. यामुळेच येथे बारालिंग हे नाव प्रचलित असावे. याच ठिकाणी दरवर्षी भाविकांची ही महापंगत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पार पडते़

अशी आहे अख्यायीकाभोकर तालुक्यामध्ये सीताखांडी गावा आहे़ या ठिकाणी रामसीता थांबल्याचे अख्यायिका सांगितली जाते़ या जोडीचा या भागात मुक्काम पडला़ या मुक्कामात राम-सीता यांनी परिसरातील झाडांचा पाला खावुन दिवस काढला़ तेंव्हापासून त्यांना मदत करणाऱ्या मंडळींनीही झाड-पाल्याची भाजी करण्याची प्रथा सुरु केल्याची या महापंगती मागील आख्यायीका असल्याचे बळीराम पवार (कोळगाव) या भाविकाने सांगितले़

टॅग्स :Fairजत्राNandedनांदेड