पहिल्या लाटेत १५, तर दुसऱ्या लाटेत हजारावर रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:34+5:302021-05-01T04:16:34+5:30
कोट- १५ दिवस क्वारंटाईन, विलगीकरण राहणे, आदींमुळे पहिल्या लाटेत हिमायतनगर तालुक्यात कोरोना पसरला नाही. दुसऱ्या लाटेत मात्र हाहाकार झाला. ...

पहिल्या लाटेत १५, तर दुसऱ्या लाटेत हजारावर रुग्ण
कोट-
१५ दिवस क्वारंटाईन, विलगीकरण राहणे, आदींमुळे पहिल्या लाटेत हिमायतनगर तालुक्यात कोरोना पसरला नाही. दुसऱ्या लाटेत मात्र हाहाकार झाला. या प्रकाराला प्रशासन आणि नागरिकच जबाबदार आहेत.
- बालाजी बल्फेवाड, प्रहार संघटना, हिमायतनगर
उपचारास बाहेरगावी गेलेल्या रुग्णांमार्फत कोरोना पसरला आणि आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले. लॉकडाऊनमध्ये अर्धी दुकाने उघडी राहिल्याने नागरिकांची गर्दी होऊन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली.
- ॲड. अतुल वानखेडे, सरसम
टाकराळा गावात पहिल्या लाटेत कठोर उपाययोजना आणि बाहेरगावच्या नागरिकांना प्रवेशबंदी घालण्यात आल्याने एकही रुग्ण आढळून आला नाही. दुसऱ्या लाटेत एक-दोन रुग्ण आढळून येताच ग्रामपंचायतीकडून निर्बंध लावून बाधितांच्या घरांतील, शेजारील नागरिकांची कोरोना टेस्ट करून घेतली. तोंडाला मास्क न लावणाऱ्या व नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांना दंड अशा नियमांमुळे नागरिकांनी सतर्क होऊन नियमांचे पालन केल्यामुळे गावात कोरोनाला रोखण्यात यश आले. तसेच लसीकरणावर भर दिला.
- बाला पाटील, सरपंच, टाकराळा