शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नांदेडच्या १४ वर्षीय शेतकरी कन्येचं अमेरिकेत विमानउड्डाण; कोंढा गावाने साजरा केला आनंदोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 07:32 IST

अनोखी कामगिरी करून रेवाने सगळ्यांना केले चकित; कोंढा गावाने साजरा केला आनंदोत्सव

- गोविंद टेकाळेनांदेड : ‘आकांक्षांपुढती गगन ठेंगणे...’ या उक्तीचा प्रत्यय अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावच्या एका शेतकरी कुटुंबातील अवघ्या १४ वर्षीय कन्येने आपल्या अनोख्या कामगिरीतून दिला आहे. कोंढा या गावच्या जोगदंड कुटुंबातील १४ वर्षीय रेवा या कन्येने पायलटचे प्रशिक्षण घेत अमेरिकेत यशस्वीरीत्या विमान उडवले आहे. तिच्या या कामगिरीची माहिती मिळताच कोंढा गावात आनंदोत्सव साजरा होत असून नांदेडकरांचा ऊर भरून आल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.  

कोंढा येथील रहिवासी केशवराव बालाजी जोगदंड यांचे पुत्र दिलीप केशवराव जोगदंड हे २० वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी (स्ट्रिंग कंट्रोल्ड) दोरीवर विमान उडवून दाखविण्याविषयी संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. यातूनच त्यांची मुलगी रेवा जोगदंड हिलाही प्रेरणा मिळाली. तेव्हापासून तिने भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल सुरू केली; आणि  हे स्वप्न सत्यात उतरविले. 

रेवा  जोगदंड हिने २० जून रोजी चक्क विमान उडवून आकाशात यशस्वी झेप घेतली आहे. तिच्या या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आला.

इतक्या लहान वयातही रेवाने विमान चालविले, याचा नक्कीच अभिमान आहे. आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेच्या बळावर बालवयातही तिने विमान चालविले. प्रत्येक स्त्रीने स्वतःवरचा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता कायम ठेवली तर यश संपादन करता येते.    - शंकरराव कदम, पोलीस पाटील, कोंढा

टॅग्स :airplaneविमानNandedनांदेडAmericaअमेरिकाMaharashtraमहाराष्ट्र