शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या १३१० कुटुंबांच्या मावेजाचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 18:05 IST

मावेजाचा प्रश्न निकाली निघाल्याने आता धरणाच्या कामाला गती मिळणार आहे़  

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाच लाभधारकांना आॅनलाईन वाटप

मुखेड : मुखेड तालुक्यातील तालुक्यातील मुक्रमाबाद येथे  होत असलेल्या  लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या १३१० कुटुंबाच्या मावेजाचा प्रश्न मार्गी लागला आहे़ १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पाच लाभधारकांना आॅनलाईन मावेजाचे वाटप करुन पैसे वितरणाची सुरुवात करण्यात आली. मावेजाचा प्रश्न निकाली निघाल्याने आता धरणाच्या कामाला गती मिळणार आहे़  

महाराष्ट्र व तेलंगणा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने इ.स. १९८४ मध्ये लेंडी धरणाची निर्मिती करण्यात आली. या धरणात मुक्रमाबाद येथील १३१० घरे बुडीत क्षेत्रात संपादित करण्यात आली. मागील ३५ वषार्पासून  लेंडी प्रकल्पग्रस्तांना मावेजा मिळाला नसल्याने येथील प्रकल्पग्रंस्तांच्या वतीने अनेक विविध आंदोलने करण्यात आली़ याच मागणीसाठी शेतकऱ्यांनी मुक्रमाबाद बाजारपेठही बंद ठेवली होती़ तसेच २०१८ मध्ये या लाभधारकांनी मावेजा मिळावा म्हणून बेमुदत उपोषणही केले होते. 

दरम्यान मागील ३  वर्षात या प्रकल्पासाठी शासनाकडून १७६  कोटी रुपये प्राप्त झाले आहेत़ १ नोव्हेंबर २०१८  रोजी जलसंपदामंत्री यांनीही मावेजाची रक्कम तातडीने देण्याबाबतचा शब्द विधिमंडळात दिला होता़ त्यानुसार  १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे झालेल्या बैठकीनंतर १३१० कुटुंबांना ९३ कोटीच्या मावेजाचे वाटप आॅनलाईन प्रणालीद्वारे करण्यास सुरुवात झाली. मुक्रमाबाद येथील वार्ड क्रमांक १  मधील  माणिक रानबा कांबळे, विठ्ठल अमृत जाधव, शशीकपूर गंगाधर तेलंग, रुक्मीनबाई नागोराव गायकवाड, सूर्यकांत रामराव मुक्रामाबादकर या ६ लाभधारकांना ७७/१ च्या  नोटिसा बजावून आॅनलान पद्धतीने   मावेजाही देण्यात आला. दरम्यान या प्रक्रियेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असून मुखेड व  मुक्रमाबाद येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला़  

टॅग्स :DamधरणNandedनांदेडfundsनिधीLendi Lakeलेंडी तलाव