१२ तलवारी अन् ३ कुकरी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST2021-07-15T04:14:19+5:302021-07-15T04:14:19+5:30

या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही विक्रेते लपून तलवारीसारख्या घातक शस्त्रांची विक्री ...

12 swords and 3 cookers seized | १२ तलवारी अन् ३ कुकरी जप्त

१२ तलवारी अन् ३ कुकरी जप्त

या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही विक्रेते लपून तलवारीसारख्या घातक शस्त्रांची विक्री करतात. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी आरोपींकडून तलवारी जप्त केल्या होत्या. त्यात उपाधीक्षक चंद्रसेन देशमुख, पोनि. जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि प्रवीण आगलावे, पोहेकॉ दत्तराम जाधव, पोना गजानन किडे, संतोष बेलू रोड हे शहरात पेट्रोलिंग करीत हाेते.

त्यावेळी त्यांना गुरुद्वारा भागातील गेट क्र. १च्या समोर असलेल्या दुकानातून तलवारीची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पथकाने लगेच त्या ठिकाणी धाव घेऊन धाड मारली. यावेळी आरोपी मनजीतसिंग स्वरूपसिंघ सरदार, रा. अबचलनगर याच्या दुकानातून १२ तलवारी, ३ कुकरी आणि एक गुप्ती अशी सात हजार रुपयांची शस्त्रे जप्त करण्यात आली.

Web Title: 12 swords and 3 cookers seized