शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

एका ॲपेत बसले १२ जण, ट्रकच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू; नांदेडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 08:18 IST

मुदखेड येथून १०-१२  प्रवासी गुरुवारी ॲपे ऑटोरिक्षाने नांदेडला जात होते.

मुदखेड (जि. नांदेड) : ट्रक आणि ऑटोरिक्षाची जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. नांदेड-मुदखेड रस्त्यावर मुगटजवळील पेट्रोल पंपासमोर गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन महिलांसह एका सात महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. जखमींवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

मुदखेड येथून १०-१२  प्रवासी गुरुवारी ॲपे ऑटोरिक्षाने नांदेडला जात होते. मुगट परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोरिक्षा पलटी झाला. ऑटोरिक्षातील काही जण ट्रकच्या चाकाखाली तर काही ऑटोमध्येच जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले. गालीअम्मा कल्याण भोई (२४), वेजल कल्याण भोई (७ महिने), पुंडलिक बळीराम कोल्हाटकर (७०), ज्योती रमेश भोई (३२) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर विद्या संदेश हटकर (३७) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड