१२ मुख्य अभियंत्यांना अखेर पदस्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:22 IST2021-08-27T04:22:35+5:302021-08-27T04:22:35+5:30
चाैकट.... जागा १२, पदाेन्नती १६ जणांना विभागीय पदाेन्नती समितीने १६ अधीक्षक अभियंत्यांच्या पदाेन्नतीच्या फाइली मंजूर केल्या हाेत्या. परंतु आजच्या ...

१२ मुख्य अभियंत्यांना अखेर पदस्थापना
चाैकट....
जागा १२, पदाेन्नती १६ जणांना
विभागीय पदाेन्नती समितीने १६ अधीक्षक अभियंत्यांच्या पदाेन्नतीच्या फाइली मंजूर केल्या हाेत्या. परंतु आजच्या घडीला मुख्य अभियंत्यांच्या बाराच जागा रिक्त असल्याने तेवढ्याच पदावर बढती दिली गेली. मुख्य अभियंत्यांच्या चार नव्या जागा निर्माण करण्याचाही प्रस्ताव आहे.
चाैकट....
चार मुख्य अभियंत्यांच्या बदल्या
सचिव पदावरील बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या चार मुख्य अभियंत्यांच्याही गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. मंत्रालयातील सहसचिव व्ही.पी. रामगुंडे यांना मुंबईत आदिवासी विकास विभागात पाठविण्यात आले. अमरावतीचे मुख्य अभियंता प्रशांत नवघरे यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई येथे नियुक्त करण्यात आले. पुणे येथील पीएमजीएसवायचे मुख्य अभियंता एस. आर. कातकडे यांना नाशिक येथे महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठात नियुक्त करण्यात आले, तर मुंबई प्रादेशिक विभागाचे के. टी. पाटील यांना मुंबईतच मेट्राे रेल्वे काॅर्पाेरेशनचे मुख्य अभियंता बनविण्यात आले आहे.